Ekta Kapoor takes Ajmer Sharif's blessings before the release of 'The Married Woman', actors were also present | ‘द मॅरिड वुमन’च्या रिलीजआधी एकता कपूरने घेतले अजमेर शरीफचे आशीर्वाद, कलाकारही होते उपस्थित

‘द मॅरिड वुमन’च्या रिलीजआधी एकता कपूरने घेतले अजमेर शरीफचे आशीर्वाद, कलाकारही होते उपस्थित

बहुचर्चित वेबसीरिज, 'द मॅरिड वुमन' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर कंटेंट क्वीन एकता कपूरने नुकतेच अजमेर शरीफ दर्ग्यावर आपल्या या वेब शोच्या यशासाठी प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतले. या वेळी तिच्यासोबत शोचे कलाकार रिद्धि डोगरा आणि मोनिका डोगरा देखील उपस्थित होत्या.  

प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांची बेस्टसेलर कादंबरी 'ए मॅरिड वुमन' वर आधारित, या शोच्या ट्रेलरने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली आहे. यशस्वी निर्माता एकता कपूरचा हा शो, जो महिला आणि त्यांची आवड निवड याच्याभोवती फिरतो, त्याबाबत विशेष उत्साहित आहे आणि या शोच्या प्रमोशन्ससाठी जयपुरच्या दौऱ्यावर आहे.  

साहिर रजा दिग्दर्शित 'द मॅरिड वुमन' एक अरबन रिलेशनशिप ड्रामा असून स्त्रिया आणि समाजाने त्यांच्यावर लादलेली बंधने आणि स्वतःचा शोध याविषयी भाष्य करते. या शोमध्ये रिधि डोगरा आणि मोनिका डोगरा मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्यासोबत इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर आणि सुहास आहूजा यांसारखे नावाजलेले कलाकार देखील आहेत. 


द मॅरिड वुमन सीरिजमध्ये रिद्धी आणि मोनिकाचे किंसिंग सीनदेखील चित्रीत करण्यात आले आहेत. याबद्दल दिग्दर्शक साहिर रजा यांनी सांगितले की , या वेबसीरिजसाठी आम्ही रिद्धी आणि मोनिकासोबत वर्कशॉप केले होते आणि त्यांना या सीरिजमधल्या काही सीन्सबद्दल सांगितले होते. त्यात दोन अभिनेत्यांनी एकमेकांना किस करणे यासारखे विषयांचा समावेश होता. असे दृश्य वास्तविक आणि सहजरित्या साकारण्यासाठी त्यांना तुम्हाला हे सीन साकारण्यासाठी कम्फर्टेबल वाटेल, असे काय करू शकतो, असे विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी सांगितले होते की, छोटे युनिटसोबत एक शांत आणि बंद सेटवर असे सीन साकारावेत. त्यांनी या शूटसाठी आम्हाला सर्वांना कम्फर्टेबल केले होते. त्या दोघी प्रतिभावंत आणि प्रोफेशनल कलाकार आहेत. त्यांनी हे दृश्य खूप छान साकारले आहेत.

‘द मॅरिड वुमन’ ८ मार्चपासून केवळ ऑल्ट बालाजी आणि झी ५वर पहायला मिळणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ekta Kapoor takes Ajmer Sharif's blessings before the release of 'The Married Woman', actors were also present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.