भागो मोहन प्यारे हि मालिका अल्पवधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतून एक सुंदर चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस आला. तो चेहरा कुठल्या अभिनेत्रीचा आहे हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात डोकावला. मोहनच्या मागे असलेली हडळ मधुवंती म्हणजेच अभिनेत्री सरिता मेहेंदळे हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सरिताने अभिनय क्षेत्रात अनेक वर्ष स्ट्रगल केलं आहे आणि त्यानंतर तिला मधुवंतीची भूमिका मिळाली.

याबद्दल बोलताना सरिता म्हणाली, "या वर्षाच्या सुरुवातीला नवऱ्यासोबत नाशिकला काही कामासाठी गेले होते. तिथे गेले असताना ‘भागो मोहन प्यारे’चे प्रोड्युसर सुजय हांडे यांचा फोन आला.

‘एका भूमिकेसाठी ऑडिशन पाठवून दे. मी तुला स्क्रिप्ट पाठवतो,’ असं सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. कामात असूनही नवऱ्यानं मोबाइलवर माझा व्हिडिओ शूट केला आणि त्यांना पाठवून दिला. रोज देतो त्यापैकीच एक ऑडिशन असेल असं समजून मी ते फार गंभीरपणे घेतलं नाही. दोन दिवसांनी मला त्यांच्याकडून लूक टेस्टसाठी ये असा निरोप आला.

तिथे जाऊन मी लूक टेस्ट दिली. त्यानंतर ‘तुला आम्ही मधुवंतीच्या मुख्य भूमिकेसाठी निवडलं आहे,’ हे सांगणारा फोन आला. ते ऐकून मला आठ वर्षांच्या संघर्षाचं चीज झाल्यासारखं वाटलं. माझी आई नेहमी म्हणते, ‘गरोदर बाई नऊ महिने जो त्रास सहन करते तो एकदा बाळाला हातात घेतल्यावर विसरून जाते.’ माझंही काहीसं असंच झालं. अजूनही मी स्वतःला यशस्वी म्हणणार नाही. मात्र यशाचा पहिला टप्पा मी गाठला आहे, असं मला नक्की वाटतंय."

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Eight years struggle now helping me-sarita mehendale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.