ठळक मुद्देजेव्हा एड शीरनला समजले की, मुलांना त्याला भेटायची इच्छा आहे, पण त्यांना पार्टीत यायची अनुमती नाही, तेव्हा तो स्वतः मुलांच्या खोलीत गेला आणि त्याने त्यांच्यासोबत काही वेळ व्यतीत केला.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडमध्ये फराह खान उपस्थित राहाणार आहे. फराह एक प्रसिद्ध कोरिओग्राफर असण्यासोबतच दिग्दर्शक, निर्माती आणि अभिनेत्री आहे. कपिलच्या या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील प्रवास, तिचे खाजगी आयुष्य यावर ती कपिल आणि तिच्या टीमसोबत गप्पा मारणार आहे. 


 
फराह खानला बॉलिवूडचा भाग होऊन आता तीन दशकाहून अधिक काळ झालेला आहे. ती तिच्या कारकिर्दीतील अनेक आठवणींविषयी द कपिल शर्मा शो मध्ये सांगणार आहे. तसेच तिच्या मुलांच्या जन्मानंतर तिच्या जीवनात झालेले बदल, तिचे आणि तिचा पती शिरीष कुंदर यांचे नाते याविषयी देखील ती गप्पा मारणार आहे. मुंबईत आलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायकाने तिच्या मुलांची एक इच्छा पूर्ण केली होती याबद्दल देखील तिने सांगितले. या गायकाने आपल्याला भेटावे अशी तिच्या मुलांची इच्छा होती आणि ती या गायकाने पूर्ण देखील केली.


 
फराहने काही महिन्यांपूर्वी एड शीरन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायकसाठी खास पार्टी आयोजित केली होती. याबद्दल कपिलने तिला या कार्यक्रमात विचारले असता तिने सांगितले की, “इतक्या उदार माणसासाठी पार्टी देणे हे माझ्यासाठी आनंददायक होते. आम्ही ही पार्टी आमच्या घरीच आयोजित केली होती. ही पार्टी घरात असली तरी मुलांना पार्टीला यायची अनुमती नव्हती. मला एड शीरनचे फक्त एक गाणे माहीत होते आणि पार्टी सुरू असताना मी DJ ला गंभीर मूडच्या गाण्यांऐवजी काही गंमतीशीर गाणी वाजवायला सांगितली. तेव्हा एड शीरनची गाणी कोणती हे मला कळले होते.”


 
फराह खान पुढे म्हणाली, “जेव्हा एड शीरनला समजले की, मुलांना त्याला भेटायची इच्छा आहे, पण त्यांना पार्टीत यायची अनुमती नाही, तेव्हा तो स्वतः मुलांच्या खोलीत गेला आणि त्याने त्यांच्यासोबत काही वेळ व्यतीत केला. त्यानंतर सहा महिन्यांनी जेव्हा कोल्ड प्ले बॅंड मुंबईत आला, तेव्हा माझ्या मुलांनी मला विचारले की, ते आमच्या खोलीत पुन्हा आम्हाला भेटायला येतील? त्यावर मी तडक उत्तर दिले, तुमच्या खूपच जास्त मागण्या आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?”

Web Title: Ed Sheeran meets Farah Khan kids in their bedroom,reveals on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.