Duryawas who come to be in Anu and Siddhartha's relationship with 'Sukha Sari' in this mind baware | 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनु आणि सिद्धार्थच्या नात्यात येणार दुरावा
'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनु आणि सिद्धार्थच्या नात्यात येणार दुरावा

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेच्या आगामी भागात अनु व सिद्धार्थच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळणार आहे. 

 मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुपासून त्याची खरी ओळख लपवली होती. इतके दिवस तो हरी बनूनच अनुला मदत करण्याचा प्रयत्न करत होता. हे सत्य दुर्गासमोर काही दिवसांपूर्वी आले होते. दुर्गाला अनु अजिबात आवडत नसल्याने तसेच तिच्याबद्दल दुर्गाच्या मनामध्ये असलेले गैरसमज या सगळ्यामुळे त्या दोघांमध्ये असलेले मैत्रीचे नाते दुर्गाला पहिल्यापासून खटकत होते. दुर्गा अनु आणि सिद्धार्थची मैत्री तोडण्यासाठी एक कट रचते. अनु आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आणण्यासाठी रचलेल्या खेळीमध्ये दुर्गा यशस्वी देखील होते. आता हा सगळा गुंता सिद्धार्थ कसा सोडवेल ? अनुची साथ पुन्हा सिद्धार्थला मिळेल ? अनु सिद्धार्थला समजून घेईल ? हे जाणून घेण्यासाठी सुखाच्या सरींनी हे मन बावरे रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर नक्की पहा.


विशूच्या वाढदिवसाच्या दिवशी दुर्गा सिद्धार्थच सत्य अनुसमोर आणते. अनुला खोट्याची चीड असल्याने हे सत्य तिच्या समोर येताच तीचा सिद्धार्थवरचा विश्वास पूर्णपणे उडून जातो. अनु आणि सिद्धार्थ मध्ये दुरावा आणण्यात दुर्गा यशस्वी होते. परंतु दुर्गाने हे सत्य अनुला सांगितले आणि तिला बरच काही ऐकवून दाखविलं हे सिद्धार्थला कळताच सिद्धार्थ दुर्गाशी बोलणे बंद करतो. आता मालिकेमध्ये पुढे काय होईल ? अनुची मैत्री आणि तुटलेला विश्वास सिद्धार्थ पुन्हा मिळवू शकेल का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत,

 

Web Title: Duryawas who come to be in Anu and Siddhartha's relationship with 'Sukha Sari' in this mind baware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.