drugs case shilpa shinde speaks on talent management companies | ड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...

ड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...

ठळक मुद्दे2017 मध्ये बिग बॉसचे 11 वे सीझन जिंकल्यानंतर शिल्पा 'पटेल की पंजाबी शादी में' या चित्रपटात एक डान्स नंबर करताना दिसली.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज कनेक्शनवरून सुरु असलेल्या चर्चेत आता अभिनेत्री शिल्पा शिंदे हिनेही उडी घेतली आहे. ड्रग्जप्रकरणी  आता  दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान अशा अनेक बड्या अभिनेत्रीही एनसीबीच्या रडारवर आल्या आहेत. दीपिका, सारा, रकुल व श्रद्धा या चौघींना एनसीबीने समन्स बजावला आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एक मोठे विधान केले आहे.
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदे बोलली.

काय म्हणाली शिल्पा?
ड्रग्ज कनेक्शनबद्दल शिल्पा म्हणाली, हे सगळीकडेच आहे, फरक इतकाच की सेलिब्रिटींची नावे घेणे सोपे आहे. ‘भाभीजी घर पर है’ प्रकरणासंदर्भात मी पोलिस अधिका-यांना भेटत होते तेव्हा त्यांना आज रात्री इथे पार्टी आहे, आज इथे रेड करायची आहे, असे अनेक मॅसेज येत. प्रत्यक्षात त्या सेलिब्रिटी नाही तर नॉर्मल पार्ट्या होत्या. मी बॉलिवूड सेलिब्रिटींची बाजू घेत नाहीये. पण हे खरे आहे. बॉलिवूडमध्ये सगळे काही खुल्लमखुल्ला होते आणि कोणत्याही सेलिब्रिटीचे नाव घेणे सोपे आहे. प्रत्येकजण सेलिब्रिटींबद्दल गॉसिप्स करतात. हे गॉसिप्स करताना लोकांना मजा येते. बॉलिवूडमध्ये चांगले लोकही आहेत, असे शिल्पा शिंदे म्हणाली.

मॅनेजमेंट कंपन्याबद्दलही केला मोठा खुलासा
ड्रग्ज प्रकरणी क्वान या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे नाव आले आहे. या पार्श्वभूमीवर शिल्पा शिंदे हिने टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांबद्दलही मोठा खुलासा केला. टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्या कोणत्याही आर्टिस्टकडे जातात, तेव्हा तुम्ही काय काय सुविधा देऊ शकता, असे कलाकारही बिनधास्तपणे विचारतात. अर्थात या सुविधा व्यक्तिनुसार बदलतात. या टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्या आर्टिस्टला देशाबाहेर घेऊन जातात तेव्हा त्याच्या सर्व गरजांची काळजी घेतात. मी मॅनेजमेंट कंपन्यांना यासाठी दोष देणार नाही. क्वानचे नाव समोर आले आहे. मात्र अशा अनेक टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्या आहेत, ज्या कलाकारांची प्रत्येक गरज पूर्ण करतात, असे शिल्पा म्हणाली.

अभिनेत्री शिल्पा शिंदे ‘या’ कारणामुळे सोडणार ‘गँग्स ऑफ फिल्मीस्तान’ शो ?

लग्नाच्या महिनाभरापूर्वी मोडले होते शिल्पाचे लग्न, आजही आहे सिंगल

2017 मध्ये बिग बॉसचे 11 वे सीझन जिंकल्यानंतर शिल्पा 'पटेल की पंजाबी शादी में' या चित्रपटात एक डान्स नंबर करताना दिसली. यानंतर तिने काही रिअ‍ॅलिटी शो केलेत. पण यापेक्षा कुठलेही मोठे यश तिच्या पदरी पडले नाही. कामापेक्षा वेगवेगळ्या मुद्यावरच्या वक्तव्यांमुळेच ती अधिक चर्चेत राहिली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: drugs case shilpa shinde speaks on talent management companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.