बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकार आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. या फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, ही अभिनेत्री सध्या छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजविते आहे. ही चिमुरडी म्हणजे  'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर. या मालिकेतून अन्विता घराघरात पोहचली आहे. तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकताच बालपणीचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचं नाव अन्विता फलटणकर आहे.


अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते. नुकतेच अन्विताने इंस्टाग्रामवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप क्युट दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.


अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती.

यानंतर २०१९ मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केले आहे.

अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि 'रुंजी' या मालिकेतही तिने काम केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Do you know this Chimurdi ?, currently dominating the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.