Divya bhatnagar dies after battling for her life on the ventilator for days covid 19 | 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरच कोरोनामुळे निधन, वयाच्या 34 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरच कोरोनामुळे निधन, वयाच्या 34 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं आज मुंबईत निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपापसून कोरोनाची लागण झाली होती त्यांनतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 26 नोव्हेंबरला दिव्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खराब झाल्यावर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. 


त्यांना न्यूमोनिया झाल्याची बातमी आहे. दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांचीऑक्सिजन पातळी कमी होत होती, ज्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आयुष्य आणि मृत्यू यांच्या दरम्यान बर्‍याच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर झुंज देणाऱ्या  दिव्या यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्या 34 वर्षांच्या होत्या. 

दिव्याची मैत्रिण आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहून दुःख व्यक्त केले आहे. तिने लिहिले, ''जेव्हा कोणी कुणाबरोबर नसायचे तेव्हा तू त्याच्यासोबत असायचीस. दिवा, तू माझी होतीस जिला मी ओरडू शकते होते, रागवू शकते होते, मनातल्या गोष्टी सांगू शकत होते. मला माहिती आहे की तू आयुष्यात खूप काही सोसलं आहेस. तू प्रचंड दु:खात होतीस.  पण आता मला माहिती हे की ती एका चांगल्या ठिकाणी आहेस. जिथं दु:ख, छोटेपणा असं काही नाही. मी तुला मिस करेन दिवु. तुला हे देखील माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझी चिंता होती. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. तू जिथे अशील तिथे आनंदी रहा. तू खूप लवकर निघून गेलीस.''

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Divya bhatnagar dies after battling for her life on the ventilator for days covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.