टिव्हीजनवरील ही अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल लाईफ इतकिच पर्सनल लाईफला घेऊन देखील चर्चेत असते. आम्ही बोलतोय, दीपिका कक्करबददल. दीपिकाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक गुडन्यूज आहे. नुकताच दीपिका आणि शोएब इब्राहिम यांच्या घरात एक नव्या पाहुण्यांची एंट्री झाली आहे. या नव्या पाहुण्यासोबतचा फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  


दीपिकान कक्करने नुकतीच एक नवी कार खरेदी केली आहे. या कारला घेऊन दोघेही खूप एक्सायडेट आहेत. या कारची भारतातील किंमत जवळपास 75 लाख रुपये आहे.  दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक फॅन्सनी तिला नव्या कारबददल शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला दीपिकाने कॅप्शन देखील दिले आहे. 


'ससुराल सिमर का' या मालिकेत काम करत असतानाच तिला  शोएब इब्राहिम भेटला. सेटवरच मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.  ब-याचदा  रिलेशनशिपबाबत या दोघांना विचारले जायचे. मात्र दोघांनीही मौनच पाळले होते. अखेर  दोघांनी तीन वर्षांपासून एकमेंकांच्या प्रेमात असल्याची जाहिर कबुली दिली होती.

दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने 'नच बलिये' या कार्यक्रमात देखील एकत्र भाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर  23 फेब्रुवारी 2019 ला दोघांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. 

Web Title: Dipika kakar and shoaib ibrahim welcome the brand new bmw car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.