छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचं आगमन झालं. धनश्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. तिने ही गोड बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 


प्रेग्नेंसीच्या काळात धनश्री फोटोशूटमुळे चर्चेत रहायची. तसेच प्रेग्नेंसीनंतरही धनश्री सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. मात्र तिचे वाढलेले वजन पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना सोशल मीडियावर तिने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.


धनश्री काडगावकरने इंस्टाग्राम स्टोरीवर इंस्टाग्रामवरील फॉलोव्हर्सचे आभार मानले आहेत आणि अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला तिच्यासोबत तिच्या चाहत्यांनी रिपोर्ट केले आहे. यावेळी तिने पोस्टमध्ये मी फुटबॉल झाले अशी कमेंट करणाऱ्यांना सुद्धा माझ्या फॉलोअर्सपैकी अनेकांनी सडेतोड उत्तर दिले आहे.तुमच्या सर्वांचे मनापासून आभार' असे म्हटले आहे.


प्रेग्नन्सीनंतर  वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्रींना ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीसुद्धा अनेक अभिनेत्रींना ट्रोल करण्यात आले आहे. 


धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर २०१३ मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते. धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhanshree Kadgaonkar scolds those who say 'your football is over ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.