Dhanashri kadgaonkar took a exit from tuzyat jiv rangala serial | OMG! 'तुझ्यात जीव रंगला'मधून नंदिता वाहिनीने घेतली एक्झिट?
OMG! 'तुझ्यात जीव रंगला'मधून नंदिता वाहिनीने घेतली एक्झिट?

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता हि मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. मालिकेत नेहमी राणा-अंजीलविरुद्ध कट-कारस्थाने करणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांना सुद्धा प्रेक्षकांनी पसंती दिली. मात्र, वहिनीसाहेब यापुढे मालिकेत दिसणार नाहीयेत. नंदिता गायकवाड म्हणजेच धनश्री काडगावकर मालिकेचा निरोप घेतला आहे.

धनश्रीनं तिच्या सोशल मीडियावर तिच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या सिनबद्दल माहिती दिली. मालिकेच्या सुरूवातीपासूनच धनश्रीची 'नंदिता' वाहिनीची भूमिका लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असूनही नंदिता वहिनींना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेतील त्यांचे संवाद, त्यांची स्टाईल इतकंच नव्हे तर त्यांची कोल्हापूरी भाषाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील वहिनीसाहेबांची भूमिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. धनश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेने ५ वर्षांचा लीप घेतला असून आता या मालिकेत राणा आणि अंजलीची मुलगी राजलक्ष्मी आणि नंदिता व सुरजचा मुलगा युवराज या व्यक्तिरेखांची एंट्री झाली आहे. युवराजच्या एकंदरीत वागण्यावरून तो नंदिताच्या पावलांवर पाऊल ठेवतोय कि काय असं वाटतंय. अंजली आणि राणा जितके शांत स्वभावाचे आहेत तितकीच त्यांची मुलगी राजलक्ष्मी तिखट आहे. युवराजचा राजलक्ष्मी समोर निभाव लागेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.  

Web Title: Dhanashri kadgaonkar took a exit from tuzyat jiv rangala serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.