तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकरला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने या मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनंही रसिकांना भुरळ पाडली आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेतच पण धनश्री म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून निरोप घेतला आहे. 

धनश्रीने नुकताच इंस्टाग्रामवर विना मेकअपमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कधीतरी मूळ रूपही चांगलं वाटतं.

या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर तिने स्वतःचा मेकओव्हर केला आहे. धनश्री काडगावकर हिने तिच्या मेकओव्हरचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. मालिकेत साडी व पारंपारिक वेशात दिसली असली तरी ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस व बोल्ड आहे. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर पहायला मिळतो.


धनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय.


सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ ती शेअर करत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhanashree Kadgaonkar without makeup look goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.