शक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज्मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:51 PM2021-04-17T17:51:38+5:302021-04-17T17:58:34+5:30

अभिनेता ललित परिमू यांना कोरोनाची लागण. भायंदर-मीरा रोड येथील कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.त्यांना तातडीने प्लाझ्माची गरज आहे.

Covid 19 positive Haider fame actor Lalit Parimoo in ICU, in urgent need of plasma | शक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज्मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज

शक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज्मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज

googlenewsNext

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली. सामान्य माणासांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत करोनाची लागण झाल्याचे समोर आले.गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकरांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, गोविंदा यांना करोनाची लागण झाली होती. आता सोनू सूदची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.त्याचपाठोपाठ आणखी एक कलाकार सध्या कोरोनामुळे जीवनमरणाच्या दारात उभा आहे.अभिनेता ललित परिमू यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली आहे. 

सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.भायंदर-मीरा रोड येथील कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.त्यांना तातडीने प्लाझ्माची गरज आहे. त्यासाठी प्लाझ्मा डोनरचा शोध घेतला जात आहे. प्रसिद्ध निर्माता-निर्देशक हंसल मेहता यांनीच सोशल मीडियावर ललित परिमू यांना प्लाझ्माची गरज असल्याचे सांगत मदतीसाठी प्लाझ्मा डोनरने पुढे येण्यासाठी आवाहन केले आहे.

लवकराच लवकर ते बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 'हैदर', 'एजेंट विनोद', 'मुबारकां', 'हजार चौरासी की मां' जैसी सिनेमा आणि शक्तीमान, 'आहट', 'कोरो कागज', 'साया', 'सीआईडी', 'रिश्ते', 'रिमिक्स' सारख्या सुपरहिट मालिकेत अभिनेता ललित परिमू झळकले आहेत.ललित परिमू अभिनया व्यतिरिक्त लेखकही आहेत.ललित यांनी ‘मैं मनुष्य हूं’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. इतकेच नाही तर अभिनय कार्यशाळाही चालवतात.


 

Web Title: Covid 19 positive Haider fame actor Lalit Parimoo in ICU, in urgent need of plasma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.