Coronavirus, actress amruta dhondge said don't believe in rumours | Coronavirus : मिसेस मुख्यमंत्री सुमी म्हणतेय, भीती या विषाणूपेक्षा जास्त घातक आहे

Coronavirus : मिसेस मुख्यमंत्री सुमी म्हणतेय, भीती या विषाणूपेक्षा जास्त घातक आहे

कोरोना व्हायरस हा जगभरात थैमान घालत असताना या व्हायरसने लोकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे. महाराष्ट्र लॉकडाऊन झालं आहे तसंच सर्वप्रकारचे चित्रीकरण देखील ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. अशातच अनेक कलाकार पुढे येऊन कोरोनाचा सामना कसा करावा याबद्दल प्रबोधन करत आहेत. मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे हिने प्रेक्षक-चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ज्यात ती असं म्हणाली आहे कि, "कोरोनापेक्षा जास्त हानिकारक म्हणजे या विषाणूपेक्षा अफवा जास्त पसरत आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी याबाबत जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाबद्दल अर्धवट माहिती असणारे आणि मनात भीती निर्माण करणारे मेसेजेस आपण आपल्या नकळत पाठवतो, ते सर्वात आधी टाळलं पाहिजे. कुठल्याही माहितीची शहनिशा केल्या शिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. या चुकीच्या माहितीमुळे मनात निर्माण होणारी भीती या विषाणूपेक्षा जास्त घातक आहे. त्यामुळे घाबरायचं नाही तर जागरूक राहायचं आणि थोडे दिवस जनसंपर्क टाळून घरीच थांबायचं. कारण आपण राहिलो घरी तर कोरोना जाईल माघारी."

 


 

Web Title: Coronavirus, actress amruta dhondge said don't believe in rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.