सगळीकडे लॉकडाऊन असताना तळहातावर पोट असणा-यांचे मात्र हाल आहेत. दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या घराचा गाडा चालतो, त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. म्हणूनच कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच त्याच्या कॉमेडीने रसिकांना हसून हसून लोटपोट करत असतो. तसेच कपिल शर्मा शो हा अनेकांसाठी नवसंजीवनी देणारा शो ठरला असल्याचे अनेक चाहते सांगत असतात.

पुन्हा एकदा या कॉमेडीच्या बादशाहाने सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. कपिलने चक्क ५० लाख रू पंतप्रधान मदत निधीत दिले आहे. कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. कपिल शर्माच्या या निर्णयाचे त्यांच्या चाहत्यांनी कौतुक केले असून त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समाजाचे ऋण मानणार्‍या, माणुसकी जपणार्‍या, संवेदनशील अशा अनेक सेलिब्रेटींनी अशाप्रकारे पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. आपणही कुठेतरी समाजाचे देणं लागतो याचे भाण ठेवत प्रत्येकाने या संकाटात अशा प्रकारे मदत करत खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे.त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी देखील अशीच मदत करणे काळाची गरज बनली आहे.

कोरोनाव्हायरसच्या सद्यस्थितीबद्दल सांगायचे म्हणजे, भारतात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या सुमारे 649 पर्यंत पोहोचली आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे महाराष्ट्रात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर गुजरातमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी 43 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
 

Web Title: Corona crisis: Kapil Sharma rushed to help poor people, Donated Millions-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.