contestant Aarti Kumari salutes former cricketer Yuvraj Singh | केबीसीतील कंटेस्टंट देतेय कॅन्सरशी लढा, तिचा संघर्ष ऐकून सर्वांचे पाणावले डोळे
केबीसीतील कंटेस्टंट देतेय कॅन्सरशी लढा, तिचा संघर्ष ऐकून सर्वांचे पाणावले डोळे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो कौन बनेगा करोडपतीमध्ये नुकतीच सहभागी झालेली स्पर्धक आरती कुमारी सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. तिला दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाला असून तिने तिच्या आजाराबद्दल शोमध्ये सांगितली. तिची कहाणी ऐकून सर्व लोक भावूक झाले होते आणि काहींचे डोळेदेखील पाणावले होते.


कौन बनेगा करोडपतीच्या ११ व्या सीझनमधील स्पर्धक आरती कुमारीने सर्वांना भावूक केलं. ती १७ सप्टेंबरला या शोमध्ये सहभागी झाली होती. आरती कुमारीला दुसऱ्या स्टेजचा कर्करोग झाला आहे. तिने शोमध्ये तिची कहाणी सांगितली. ती ऐकून सगळे भावूक झाले.

माजी क्रिकेटर युवराज सिंगने देखील कॅन्सरग्रस्त आरती कुमारीवर ट्विट केलं. त्याने तिच्या मनोबलाचे कौतूक केले. त्याने ट्विटमध्ये म्हटलं की, आरती कुमारचे मनोबल पाहून खूप आनंद झाला. तिच्यासारखे लोक कर्करोगासोबत सामना करण्यासाठी खरी प्रेरणा आहे.
युवराज सिंगदेखीस केबीसीच्या नवव्या सीझनमध्ये आला होता. त्यावेळी त्याने तिथे त्याच्या कॅन्सरसोबत केलेल्या लढाईबद्दल सांगितलं होतं. त्याची कथा ऐकून उपस्थित सर्व भावूक झाले होते.


आरती कुमारीने तिला कॅन्सर झालं आहे हे तिच्या घरातल्यांना समजल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितलं. त्याचा कुटुंबावर कसा परिणाम झाला, हे सांगितलं. आतादेखील ती बँकेत काम करते. केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन व इतर लोक तिची कथा ऐकून खूप प्रभावित झाले. आरती कुमारीने १० प्रश्नांची उत्तर अगदी सहजतेनं दिली.


Web Title: contestant Aarti Kumari salutes former cricketer Yuvraj Singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.