Comedian Navin Prabhakar enters Sony SAB’s Jijaji Chhat Per Hain | 'जिजाजी छत पर हैं'मध्‍ये प्रसिद्ध कॉमेडीयन नवीन प्रभाकर

'जिजाजी छत पर हैं'मध्‍ये प्रसिद्ध कॉमेडीयन नवीन प्रभाकर

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर हैं' मालिकेत पुन्‍हा एकदा इलायची (हिबा नवाब) आणि पंचमच्‍या (निखिल खुराणा) प्रेमकथेमध्‍ये आणखी एक नवीन वळण येणार आहे. आपल्‍या विनोदी शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करणारा लोकप्रिय कॉमेडीयन नवीन प्रभाकर जिजाजी छत पर हैं मध्‍ये गेंडालालच्‍या भूमिकेत दिसणार आहे.

एक प्रख्‍यात अभिनेता गेंडालाल मुरारीच्‍या दुकानामध्‍ये येतो. इलायची त्‍याला महागडा लेहंगा मोफत देण्‍याचे मंजूर करते. पण त्‍यासाठी त्‍याने तिच्‍या नवीन कल्‍पनेला पाठिंबा दिला पाहिजे. इलायची मुरारीला या विचारामध्‍ये अडकवण्‍याची योजना आखते की, मुरारीला वाटले पाहिजे. गेंडालाल हेच पंचमचे श्रीमंत, पण निराश वडील आहेत, जे त्‍याच्‍या मुलासोबत पुन्‍हा एकत्र येण्‍यासाठी काहीही करण्‍यास तयार आहेत. गेंडालाल मुरारीसोबत वेळ व्‍यतित करायला
सुरूवात करतो. लवकरच गेंडालाल पंचमच्‍या इलायचीसोबतच्‍या विवाहाचा विषय काढतो. मुरारी पंचम आणि इलायचीच्‍या विवाहाला होकार देईल का की, त्‍याला गेंडालालची खरी ओळख कळेल?
नवीन प्रभाकर म्‍हणाला की, 'लोकांना हसवणे व त्‍यांचे मनोरंजन करणे ही माझी आवड आहे. मी पंचमच्‍या खोट्या वडिलांच्‍या भूमिकेत दिसणार आहे. तो मुरारीला फसवून पंचमचा इलायचीसोबत विवाह करण्‍याची मागणी करणार आहे. मी एका अनोख्‍या अवतारात जिजाजी छत पर हैंसारख्‍या लोकप्रिय मालिकेचा भाग असण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. मी आशा करतो की, प्रेक्षकांना पटकथेतील हा नवीन ट्विस्‍ट आवडेल. गेंडालाल पंचम-इलायचीच्‍या
प्रेमकथेला आकार देण्‍यासाठी सज्‍ज आहे.'

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Comedian Navin Prabhakar enters Sony SAB’s Jijaji Chhat Per Hain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.