ग्लॅमरच्या दुनियेत अभिनेत्रींना विनामेअकप पाहिले तर त्यांच्या फॅन्सना त्यांचा हा विनामेकअप लूक पाहून थोडा धक्काच बसतो. ऑनस्क्रीन दिसणारी सुंदर व्यक्ती ही जेव्हा प्रत्यक्षात समोर दिसते तेव्हा तितकीच ती ग्लॅमरस दिसेन असे नाही. त्यामुळे कामा व्यतिरिक्त आपण जसे आहोत तसेच रहावे, दिसावे यावर ब-याच सेलिब्रेटींचा भर असतो. त्यामुळे चेह-यावर मेकअप नसला तरीही सार्वजनिक ठिकाणीही फिरताना दिसतात. कपिलच्या शोमध्ये कपिलची पत्नी बनलेली सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या बिकीनी लूकमुळे चर्चेत असताना तिचा आणखीन एक लूक समोर आला आहे. यात ती लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत असली तरी तिचा हा विनामेकअप लूक पाहायला मिळतोय. मेकअप नसल्यामुळे सुमोनाच्या फॅन्सना तिला ओळखणे कठिण झाले आहे. काही युजर्सने तर तिच्या या फोटोवर कमेंट करत तिला ओखलेच नाही अशा कमेंटस केल्या आहेत. तर काहींनी सुमोना ग्लॅमरस दिसत असल्याचे म्हटले आहे. 

नववधू अंदाजातील फोटो पाहून चाहते संभ्रमात 


काही दिवसांपूर्वीच सुमोनाचा  नववधू अंदाजातील फोटो समोर आला होता. फोटोत सुमोनाच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच होत्या. नववधू रुपातील अंदाज पाहून सुमोना लग्न करत असल्याच्याही चर्चा रंगल्या. सुमोनाने कोणत्या प्रोजेक्टसाठी हा मेकअप केला आहे याविषयी कोणत्याही प्रकारचा खुलासा तिने केला नव्हता. त्यामुळे हा फोटो पाहून तिचे चाहतेही संभ्रमात पडले होते. 

 

सुमोनाला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात


सुमोना आज लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत मोडली जाते. मात्र या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सुमोनाला अनेक वर्षांपासून एक वाईट सवय होती. पण आता ती वाईट सवय तिने सोडली असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ती स्मोकिंगच्या पूर्ण अधीन गेली होती, पण तिने दोन वर्षांपूर्वी सिगरेट पिणे पूर्णपणे कशाप्रकारे सोडले याचा उल्लेख तिने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे केला होता. एक अभिनेत्री असल्याने मला लोक मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. लोक कलाकारांवर प्रेम करतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी आत्मसात करतात. त्यामुळे माझ्या या अनुभवामुळे काही लोक तरी प्रेरणा घेतील असे तिने म्हटले होते.


Web Title: Comedian Kapil Sharma's Heroin Sumona Chakravarti Without Make Up Look Viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.