मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर भाऊ कदमने त्याच्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फू बाई फू या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याला मिळालं आहे. तो सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात तो दर भागात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील त्याचे चाहते झाले आहेत.

भाऊ कदमने टाइमपास, टाइमपास २, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. भाऊ कदमला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सना नेहमीच इच्छा असते.

भाऊच्या पत्नीचे नाव ममता असून त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना तीन मुली असून भाऊ नेहमीच आपल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

भाऊ कदमचे बालपण मुंबईतील वडाळा येथील बीपीटी क्वॉर्टर्समध्ये गेलं आहे. त्याचं शालेय शिक्षण देखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झाले. पण त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर त्याला वडाळ्यातील जागा सोडावी लागली. त्यानंतर तो कुटुंबियांसमवेत डोंबिवलीत राहायला गेला.

त्याची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्याने अनेक छोटी-मोठी कामे केली. पण अभिनय हे नेहमीच त्याचे पहिले प्रेम होते.

भाऊने रंगभूमीवरून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

जाऊ तिथे खाऊ हे त्याचे नाटक त्या काळात चांगलेच गाजले होते.

या नाटकामुळे त्याच्या करियरला एक दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Comedian brother Kadam's wife looks very beautiful, see their photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.