Comeback on the small screen of Deepak Deulkar and Nishigandha Wad | दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक
दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

मराठी इण्डस्ट्रीतली लोकप्रिय जोडी अर्थातच दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करायला सज्ज आहेत. 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेच्या निर्मात्याच्या रुपात हे दोघं प्रेक्षकांना भेटणार आहेत. १७ जूनपासून सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका रसिकांना पाहाता येणार आहे. दत्त संप्रदाय खूप मोठा आहे. अगदी श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थांपासून ते अगदी शंकर महाराजांपर्यंत. अवतार अनेक असले तरी मूळ मात्र एकच. त्याच मूळ अवताराची कथा म्हणजे ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका. दत्तगुरुंचा जन्म कसा झाला? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनुसुये सोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे. दत्तगुरुंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच असेल.


या मालिकेच्या लेखनची स्वामी बाळ यांनी केले आहे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट या मालिकेचं आणखी एक वैशिष्टय म्हणता येईल. 


Web Title: Comeback on the small screen of Deepak Deulkar and Nishigandha Wad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.