Chimukalya guest will be arriving in the series 'Rang Mazha Vegla' | कुणीतरी येणार गं..! 'रंग माझा वेगळा' मालिकेत चिमुकल्या पाहुण्याचं होणार आगमन

कुणीतरी येणार गं..! 'रंग माझा वेगळा' मालिकेत चिमुकल्या पाहुण्याचं होणार आगमन

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. आईचे सुख मिळवण्यासाठी नेहमी धडपडणारी दीपा आई होणार आहे. 

रंग माझा वेगळा मालिकेतल्या या सुखद वळणाविषयी सांगताना दीपाची भूमिका साकारणारी  अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, ‘दीपाला लहानपणापासूनच आईचे प्रेम मिळाले नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर बाळाची चाहूल लागली आहे. त्यामुळे दीपा खूपच आनंदात आहे. आमच्या सेटवरही आनंदाचे वातावरण आहे. यापुढील भाग शूट करण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत.’


‘रंग माझा वेगळा’ मालिकेतलं हे वळण उत्कंठा वाढवणारे असलं तरी दीपा खरी प्रेग्नेंट आहे मात्र त्याआधी श्वेता प्रेग्नेंट होण्याचे खोटे नाटक करत असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. त्यामुळे मालिकेत श्वेता प्रेग्नेंट नसल्याचे समोर आल्यानंतर सौंदर्या काय करतील, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

तसेच  तरी दीपाची ही गूड न्यूज इनामदार कुटुंबात कश्या पद्धतीने स्वीकारली जाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.पहावी लागेल.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chimukalya guest will be arriving in the series 'Rang Mazha Vegla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.