गेली चार वर्षे ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमातील विनोदवीरांसोबतच कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर असो किंवा बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी असो सगळ्यांची मिमिक्री श्रेया करते आणि सर्व प्रेक्षकांना ते आवडतं देखील.

'चला हवा येऊ द्या' या शोमधून  श्रेया खरी लोकप्रियता मिळाली आहे. ऑन एंड ऑफ स्क्रीन तिचा प्रत्येक लुक रसिकांना आवडतो. सोशल मीडियावद्वारे तिच्या प्रत्येक फोटोंना तिचे फॅन्स तिला कमेंटस आणि लाईक्स देत असतात. श्रेयाचा एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे. श्रेयाच्या फोटोतील  अदांनी सा-यांना वेड लावलंय.

फोटोतील बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. काही फोटोमध्ये श्रेयाचा निरागसपणा दिसून येत आहे. तर काही फोटोंमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात. आकर्षक स्टाईल आणि फॅशनची असलेली जाण यामुळे प्रत्येक फोटोत श्रेयाचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत तिने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे. विविध स्टाईलमधील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.

श्रेया बुगडेला झाला सगळ्यात जास्त फायदा, वाचा सविस्तर
 

ट्रेनमध्ये पिना विकणारी बाई, गाणं गाणारे भिकारी, कॉलेजमध्ये येणाऱ्या हायफाय मुली, चहावाला अशा सगळ्यांचे आवाज, हावभाव याचं निरीक्षण सुरू करायचे. त्यामुळे जेव्हा मला मिमिक्री कर असं सांगण्यात आलं, तेव्हा या निरीक्षणाच्या सवयीचा मला खूप फायदा झाला. यातूनच मी साकारलेली अनुष्का शर्मा, स्पॅनिश बाई आणि इतर अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या." 


 

Web Title: Chala Hawa Yeu Dya Fame Shreya Bugde Bold Look Pictures Are Raising Temperatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.