'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे फुल टू फिल्मी!, पत्नी दिसायला आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 05:24 PM2021-10-15T17:24:49+5:302021-10-15T17:25:18+5:30

'हसताय ना हसायलाच पाहिजे' असे म्हणत डॉ. निलेश साबळेने शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले.

'Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable's love story is full to filmy !, wife looks beautiful | 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे फुल टू फिल्मी!, पत्नी दिसायला आहे सुंदर

'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे फुल टू फिल्मी!, पत्नी दिसायला आहे सुंदर

Next

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्याने अख्ख्या महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले आहे. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' असे म्हणत डॉ. निलेश साबळेने शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले.  आपल्या अचूक कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. निलेश साबळेचे खूप मोठे फॅन फॉलोव्हिंग आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. निलेश साबळेच्या पत्नीबद्दल जाणून घेण्याची सर्वांची इच्छा आहे.

अभिनेता निलेश साबळेने आपल्या सेन्स ऑफ ह्युमरच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्याने 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र त्याला खरी ओळख 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून मिळाली. मात्र निलेशसाठी हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. डॉक्टरची पदवी घेऊनही निलेशने अभिनयाच्या आवडीसाठी या क्षेत्रात कष्ट घेतले. यामध्ये त्याला तिच्या कुटुंबियांची आणि पत्नी गौरीची मोठी साथ मिळाली होती.


निलेश साबळेची पत्नी लाइमलाईटपासून दूर राहते. ती आणि निलेशदेखील सोशल मीडियावर तितके सक्रिय दिसत नाही. त्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे फोटोसुद्धा तितकेसे पाहायला मिळत नाहीत. निलेश आणि गौरीची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे. निलेश आणि गौरीचा लव्ह मॅरिज झाले आहे. या दोघांची ओळख कॉलेजमध्येच झाली होती. खरे सांगायचे तर हे दोघे एकाच कॉलेजमध्ये नव्हते. मात्र एका कार्यक्रमानिमित्त निलेश गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता. यावेळी दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीनंतर निलेश आणि गौरीमध्ये मैत्री झाली होती. हे दोघे एकेमकांचे खास मित्र बनले होते. काही कालावधीनंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. यानंतर या दोघांनी लग्नसुद्धा केले. आता या दोघांच्या संसाराला जवळजवळ १०-११ वर्षे झाली आहेत.

नात्याच्या सुरुवातीलाच निलेशने गौरीला सांगितले होते की आपल्याला या वैद्यकीय क्षेत्रात अजिबात रस नाही. मला अभिनयाचे वेड आहे. त्यानंतर गौरीने त्याला प्रत्येक निर्णयात साथ देण्याची कबूली दिली होती आणि गौरी  त्याच्या पाठीशी उभी राहिली. 

Web Title: 'Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable's love story is full to filmy !, wife looks beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app