'चला हवा येऊ द्या' फेम अकुंर वाढवेची हवाच,पत्नीही दिसायला फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:00 AM2021-09-24T09:00:00+5:302021-09-24T09:00:00+5:30

अकुंर वाढवे कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो.

Chala Hawa Yeu Dya Fame Ankur Wadhave has gorgeous wife, check details about his love life | 'चला हवा येऊ द्या' फेम अकुंर वाढवेची हवाच,पत्नीही दिसायला फारच सुंदर

'चला हवा येऊ द्या' फेम अकुंर वाढवेची हवाच,पत्नीही दिसायला फारच सुंदर

Next

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे अकुंर वाढवेलाही रसिकांची तितकीच पसंती मिळते.'चला हवा येऊ द्या' मुळं अंकुर घराघरांत पोहोचला.

विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. स्त्री पात्रसुद्धा मोठ्या खुबीने तो साकारतो. हे पात्र साकारतानाही त्याचं कॉमेडीचं अफलातून टायमिंग दिसून येतं.

स्त्री पात्र अत्यंत सफाईने आणि मोठ्या खूबीने तो साकारतो. त्यात जराही वावगेपण किंवा अश्लीलपणा वाटत नाही. त्यामुळं अंकुरही या सगळ्यापैकी एक रसिकांचा आवडता बनला आहे. 'करुन गेलो गाव', 'गाढवाचं लग्न', 'सर्किट हाऊस','आम्ही सारे फर्स्ट क्लास' , 'सायलेन्स' , 'कन्हैय्या 'यासारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘जलसा’ या मराठी सिनेमातही त्याने काम केलं होतं.

सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. विविध फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. कुटुंबासोबतचे खास फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. या सगळ्यात अंकुर वाढवेची पत्नीही लक्ष वेधून घेते. अंकुरची पत्नी दिसायलाही फार सुंदर आहे. विशेष म्हणजे अंकुरने यवतमाळमध्ये कोर्टमॅरेज करत अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले होते.  या लग्नसोहळ्यात कोणताही थाटमाट, बडेजावपणा बिल्कुल नव्हता.

इतरांनी लग्नसोहळ्यांवर फार खर्च न करता साध्यापद्धतीने लग्न करावे असा संदेशच त्याने दिला होता. दोघांचेही एकत्र फोटो पाहून चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. या कपलच्या आयुष्यात मुलीचेही आगमन झाले आहे. मुलगी झाल्याची आनंदाची बातमीही त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. 
 

Web Title: Chala Hawa Yeu Dya Fame Ankur Wadhave has gorgeous wife, check details about his love life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app