तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून टिआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाच्या भूमिकेत असलेली दिशा वाकानी गेल्या कित्येक महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीये. ती मालिकेत नसल्याचा मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे अनेकांना वाटले होते. पण आजही या मालिकेचा टीआरपी खूपच चांगला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळेच कलाकार सध्या चांगलंच कमावत आहेत. या लोकांची केवळ एक दिवसाची कमाई किती आहे हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एमएसएन या वेबसाईटने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांना चित्रीकरणासाठी एका दिवसाचे किती पैसे मिळतात याबाबत लिहिले आहे. या बेवसाईटनुसार तारक मधील प्रत्येक कलाकाराला प्रत्येक दिवसासाठी इतके पैसे मिळतात.

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीला एका भागासाठी १.५ लाख रुपये मिळतात.

भिडे म्हणजेच मंदार चांदवलकरला एका भागाचे ८० हजार रुपये मिळतात.

तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढाला एका भागाचे १ लाख रुपये मिळतात.

गुरुचरण सिंग म्हणजेच सोढी आणि अनुज महाशब्दे म्हणजेच अय्यरला ६५-८० हजार मिळतात. 

बापूजी म्हणजेच अमिता भटला ७० ते ८० हजार रुपये मिळतात.

शरद सकलला म्हणजेच अब्दुलला एका भागाचे ३५-४० हजार मिळतात.

डॉ. हाथी म्हणजेच निर्मल सोनीला २०-२५ हजार रुपये मिळतात. 

सगळ्या महिला कलाकारांना ३५ ते ५० हजारांच्या दरम्यान मानधन मिळते. 

टप्पूसेनाला २० हजार रुपये मिळतात. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळेच कलाकार घेतात अव्वाच्या सव्वा मानधन, एका भागासाठी मिळतात इतके हजार

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The cast of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' per episode payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.