अभिनेत्री अक्षया देवधर हिची ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.  'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तर दुसरीकडे 'का रे दुरावा' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सुयश टिळकसोबत अक्षयाचे अफेअर होते. या दोघांनी कधीच आपले नात्याविषयी मनमोकळेपणाणे कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसायचे.त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.. तितकी ब्रेकअपचीही चर्चा होत आहे.

सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे एकत्र फोटो बघायला मिळायचे. मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्याही चर्चा आहेत. दोघांनी सोशल मिडीयावर एकमेकांना अनफॉलोही केले असल्याचे सजतंय.  गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर कसलीच माहिती शेअर केली नाही. यावरून दोघांचे ब्रेकअप झाल्याचेही तर्कवितर्क लावले जात आहे. 


अक्षया देवधर आणि सुयश टिळक यांच्या प्रेमकथेविषयी लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळले होते.अक्षयाने इन्स्टाग्रामवर सुशयसोबतचा एक फोटो शेअर करताना त्याखाली, ‘मिसिंग यू...लव्ह’ असे लिहिले होते. तर सुयशनेही 'मिस यु टु....लिहीले होते.'  त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याचा अंदाज चाहत्यांना आला होता. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं चाहत्यांसाठीही नवीन काही राहिलं नव्हते. 


तसेच लॉकडाऊनमध्येही शूटिंग बंद असल्यामुळे  पुण्यात तिच्या घरी कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसली.  वाचन, टीव्ही, सिनेमे बघण्यात तर किचनमध्ये काहीना काही नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसली तसेच मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा असे चाहत्यांना सकारात्मक संदेशही दिला होता.


सुयशने त्याच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना त्याचा आणि अक्षयाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोसोबत सुयशने नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम, आनंद सगळीकडे पसरवा असे लिहिले होते. या फोटोत अक्षयाच्या हातात एक छानशी अंगठी दिसत होती. ही अंगठी पाहूनच त्या दोघांनी साखरपुडा केला असल्याची चर्चा रंगली होती. अक्षयाच्या हातातील सुंदर अंगठी पाहून तुम्ही साखरपुडा केला असल्याचे आम्हाला वाटत आहे अशा प्रतिक्रिया लोकांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी दिल्या होत्या. त्यावेळी दोघांनीही गुपचूप साखरपुडा केल्याच्याचीही तुफान चर्चा झाली होती. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Breakup of Akshay Deodhar and Suyash Tilak? Both of them unfollowed each other On Social Media, deleted photos too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.