boy who won Rs 1 crore 19 years ago in KBC has now become an IPS officer TJL | KBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी

KBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी

अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीमुळे कित्येक लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या शोमध्ये मिळालेल्या रक्कमेसोबतच त्यांना ओळखही मिळाली. या शोमध्ये जिंकलेल्या कित्येक लोकांच्या इंटरेस्टिंग समोर आल्या. अशीच एक स्टोरी सध्या चर्चेत आली आहे. 

2001 साली कौन बनेगा करोडपतीचे स्पेशल सीझन आला होता ज्याचे नाव होते केबीसी ज्युनिअर. या शोमध्ये 14 वर्षांचा मुलगा रवि मोहन सैनीने सर्व पंधरा प्रश्नांची उत्तर अचूक देऊन एक कोटी रुपये जिंकले होते. या गोष्टीला दोन दशक उलटून गेले आहेत आणि आता तो मुलगा आयपीएस अधिकारी बनला असून पहिले पोस्टिंगदेखील घेतले आहे.

रवि मोहन सैनी आता फक्त 33 वर्षांचा आहे. त्यांनी गुजरातमधील पोरबंदर येथे पोलिस अधिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सैनी यांनी सांगितले की,त्यांनी महात्मा गांधी मेडिकल कॉलेज जयपूरमधून एमबीबीएसनंतर इंटर्नशीपदरम्यान त्यांची निवड सिविल सर्विसेजमध्ये झाली होती. त्यांचे वडील नेव्हीमध्ये होते. त्यांना प्रभावित होऊन आयपीएस बनण्याचे ठरविले.

भारतीय पोलीस दलात सैनीची निवड 2014 साली झाली होती. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर 461वी रँक मिळवली होती. 

कौन बनेगा करोडपतीचा बारावा सीझन लवकरच सुरू होणार आहे. अमिताभ बच्चन यांनी याची घोषणा एका व्हिडिओच्या माध्यमातून केली होती. लॉकडाउनमुळे या शोचे यंदा ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: boy who won Rs 1 crore 19 years ago in KBC has now become an IPS officer TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.