Bigg Boss teaches Rakhi Sawant how to do Housework shares funny video | ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है...! राखी सावंतने शेअर केला भन्नाट व्हिडीओ

ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है...! राखी सावंतने शेअर केला भन्नाट व्हिडीओ

ठळक मुद्देसलमान खान व सोहेल खान यांच्यामुळेच राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीने स्वत: याबद्दल सांगितले होते.

‘बिग बॉस 14’ मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रुपए घेऊन राखीने शो सोडला होता. ‘बिग बॉस 14’च्या घरातील राखीच्या एका एका करामतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. आता शो संपला आहे आणि राखी आपल्या आईजवळ परतली आहे. राखीची आई कॅन्सरशी लढतेय. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण इतक्या दु:खाकष्टानंतरही राखी बिग बॉसच्या घराबाहेरही लोकांना एंटरटेन करतेय. राखीने  इन्स्टावर एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
व्हिडीओत राखी भांडी घासण्यापासून झाडू-पोछा ते कपडे धुण्यापर्यंत अनेक कामं करताना दिसतेय. साहजिकच घरातील ही सर्व कामं करताना राखीला बिग बॉसच्या घराची आठवण येतेय.

‘बिग बॉस आणि सलमानने मला गृहिणी बनवून सोडले. मला सर्व कामे शिकवलीत. बिग बॉस संपला पण मी जणू वेडी झालेय आणि घरची कामं करतेय,’ असे व्हिडीओत राखी म्हणतेय. लादी पुसताना ‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है.. और यहां पावरी नहीं हो रहा है, यहां सिर्फ पोछा लग रहा है, घर साफ हो रहा है,’ असे राखी म्हणतेय.
 याशिवाय राखीने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात चाहत्याकडून मिळालेली एक भेटवस्तू राखी दाखवतेय.

सलमान खान व सोहेल खान यांच्यामुळेच राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीने स्वत: याबद्दल सांगितले होते. सोहेल भाईने माझी खूप मदत केली. मी त्यांना मॅसेज केला होता. मला इंडस्ट्रीत काम करायचे आहे. मला ‘बिग बॉस’मध्ये जायचे आहे. काम मागण्यात मला काहीही लाज वाटत नाही, असे मी त्यांना म्हणाले होते. कदाचित सोहेलभाईने सलमान भाईपर्यंत माझा मॅसेज पोहोचवला असावा, असे राखी म्हणाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss teaches Rakhi Sawant how to do Housework shares funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.