सार्वजनिक ठिकाणी शीव ठाकरे दिसला मास्कशिवाय, रेल्वेतून केला होता प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:02 PM2021-02-27T16:02:26+5:302021-02-27T16:06:32+5:30

बिग बॉस मराठी फेम शीव ठाकरेने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आपल्याला रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे.

bigg boss marathi 2 winner shiv thakare travel in train without mask | सार्वजनिक ठिकाणी शीव ठाकरे दिसला मास्कशिवाय, रेल्वेतून केला होता प्रवास

सार्वजनिक ठिकाणी शीव ठाकरे दिसला मास्कशिवाय, रेल्वेतून केला होता प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आपल्याला रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे. पण त्याने मास्क घातलेला नाही.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावा असे केंद्र आणि राज्य सरकार सांगत आहे. मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून दंड देखील आकारला जात आहे. पण या गोष्टीकडे सेलिब्रेटी कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

बिग बॉस मराठी फेम शीव ठाकरेने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आपल्याला रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे. पण त्याने मास्क घातलेला नाही. त्याने दोन तृतीयपंथीयांसोबत फोटो काढला असून तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण त्याच्याप्रमाणेच या तृतीयपंथीयांनी देखील मास्क घातलेला नाही. मात्र ट्रेनमध्ये बसलेल्या इतर लोकांनी मास्क घातला असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. 

बिग बॉस सीजन २ चे विजेतेपद पटकावून संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बनलेला शीव ठाकरे गेल्या काही दिवसांपूर्वी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला होता. ‘आपला माणूस’ ह्या हॅशटॅगने विशेष ओळखल्या जाणाऱ्या शिवने स्वतःच्या ‘बी-रियल’ ब्रॅण्डची घोषणा केली होती. त्याच्या सोशल मीडिया साईटवर त्याने ‘बी-रियल’चा लोगो शेअर करत, त्याची माहिती दिली होती. शिवने याविषयी सांगतले होते की, ‘आपण पाहतो की, ऑफिसला जाणारी मंडळी दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डीओचा वापर करतात. सामान्य माणसाला आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी दिवसभर फ्रेश राहण्यास हा डीओ मदत करेल.

अमरावती जिल्ह्यात लहानाचा मोठा झालेला शीव ठाकरेला नृत्यदिग्दर्शक व्हायचं होतं. ते स्वप्न त्यानं पूर्ण केलं. त्यानंतर त्याला 'एमटीव्ही रॉडीज'मध्ये स्पर्धक बनण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो या सीझनचा विजेता ठरला. 

Web Title: bigg boss marathi 2 winner shiv thakare travel in train without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.