Bigg Boss Marathi 2: Pushkar Listener Tells how Abhijit Kelkar tricked him into coming to Bigg Boss! | Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले!
Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले!

'ये रे ये रे पैसा २' चित्रपटातील कलाकारांच्‍या उपस्थितीने बिग बॉसच्‍या घरामध्‍ये जणू उत्‍साह व आनंद पसरला. घरामध्‍ये इतर स्‍पर्धकांसोबत राहतानाच्‍या आणि त्‍यांच्‍या प्रत्‍यक्ष जीवनातील अनुभवाबद्दल देखील आपल्‍याला वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये जाणून घेता येणार आहे. यामध्‍ये 'ये रे ये रे पैसा २' चित्रपटातील अभिनेता पुष्‍कर श्रोत्री याने बिग बॉसच्‍या घरात प्रवेश करण्‍यापूर्वी अभिजीत केळकरने त्‍याला कसे खोटे सांगितले ते सांगत आहे.  

''मी एक वेबसिरीज करायला चाललो आहे २४ मे ला, ३ महिने, ह्याने मला असं सांगितलेलं!'' असे पुष्‍कर श्रोत्रीने म्‍हटल्‍याबरोबर अभिजीत केळकर त्‍यावर हसायला लागतो, पुष्‍कर पुढे म्‍हणतो, ''आमच्‍या एका नाटकाचा प्रयोग होता, तर झालं असं की ह्याच्‍या ऐवजी जो काम करणार होता ना तो म्‍हणाला माझ्या एका प्रयोगाचा प्रॉब्‍लेम आहे ४ जूनच्‍या प्रयोगाचा मे बी. तर मी केळकरला म्‍हणालो की, तू कुठे शूट करतोयस, तू येऊ शकतोस का एका प्रयोगासाठी आणि हा लगेच मी लंडनमध्‍ये आहे. त्‍याने तेव्‍हा त्‍याची जागा ठरवली! आधी फक्‍त बोलला मी वेब सिरीजच्‍या शूटिंगमध्‍ये बिझी आहे, तू कुठे शूट करतोयस, एका शोसाठी येऊ शकतोस का विचारल्‍यावर ह्याने जागा ठरवली आणि बोलला मी लंडनमध्‍ये शूट करतोय. तेव्‍हा माझं कन्‍फर्म झालं की काही गडबड आहे.'' 

पुष्‍कर नंतर सांगणे सुरुच ठेवतो की अभिजीतने कशाप्रकारे त्‍याला फसवलं आणि तो म्‍हणतो, ''इथे येण्‍यापूर्वी मुलुंडला याचा प्रयोग होता शेवटचा प्रयोग, हा मुलुंडला राहतो आणि आम्‍ही सगळे ह्याला काय बोललो मुलुंडचा प्रयोग आहे मग ह्या नंतर तू शूटिंगला चालला आहेस ३ महिने नाही आहेस, चल ना पार्टी करुया, तर ह्याचं लगेच नाही नाही मला कुठेतरी जायचं आहे. ह्याला फोर्स केलं आम्‍ही पण हा ऐकायलाच तयार नाही, ४.३०चा प्रयोग होता तर ७.३०ला संपल्‍यानंतर पार्टी करुन जाऊ शकतोस आणि ह्याने काय केलं मग, हा पळून गेला आम्‍हाला न भेटता! आम्‍ही मेकअप काढेपर्यंत हा गायब!'' यावर सर्वजण खळखळून हसू लागतात. यावर लाजराबुजरा होत अभिजीत म्‍हणतो, ''कारण मग तुम्‍ही माझ्याकडून काढून घेतलं असतास ना!''   

पुष्‍कर पुढे म्‍हणतो, ''जेव्‍हा तू पॉज घेऊन मग लंडनमध्‍ये शूट करतोयस असं बोललास ना, तो मधला गॅप होता ना तिथेच समजलं मला. म्‍हणून मी दाखवलं की मला कळलं नाही. तू नंतर बाहेर पडल्‍यावर बघ, ज्‍या दिवशी तू एंट्री केलीस ना इथे, त्‍या दिवशी आपल्‍या ग्रुप वरती तुला शुभेच्‍छांचे केवढे मेसेजेस असणार!'' 

आपल्‍याला म्‍हणावं लागेल की अभिजीत केळकर हा खरा खेळाडू आहे! घरातील अधिक मजेशीर क्षण जाणून घ्‍या वूटच्‍या अनसीन अनदेखावर.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Pushkar Listener Tells how Abhijit Kelkar tricked him into coming to Bigg Boss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.