बिग बॉस फेम शेफाली जरीवाला हिच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. शेफालीचा पती प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पराग त्यागीच्या वडिलांचे निधन झाले आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  पराग आणि शेफाली मुंबईतून फ्लाईट पकडून दिल्लीला पोहोचले आहेत. परागचे कुटुंबीय गाजियाबादमधील मोदीनगर परिसरात रहाते.   


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार गेल्या अनेक दिवसांपासून परागचे वडील आजारी होते. लॉकडाऊनमुळे परागचा भाऊ ऑस्ट्रेलियातून येऊ शकला नाही. त्यामुळे सर्व जबाबादारी परागने पार पाडली. रिपोर्टनुसार परागने सांगितले, हो, गेल्या काही दिवसांपसाून त्यांच्या तब्येत ठीक नव्हती. सोमवारी त्यांचे निधन झाले. डायलिसिससाठी जात असताना रस्त्यात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. माझी पत्नी शेफाली आणि मी घरी पोहोचलो आहेत. जर फ्लाईट सुरु झाल्या नसत्या तर आम्हाला रस्त्याच्या मार्गाने यावा लागले असते. 

परागने पवित्र रिश्ता,  'ब्रह्मराक्षस', 'काला टीका' आणि 'अघोरी' सारख्या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. याशिवाय 'ए वेडनेसडे', 'सरकार 3' आणि 'रूलर' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss fame shefali jariwala's father-in-law dies gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.