Bigg Boss Ex Contestant Hits with Joy Tejwani Wife Enjoying Romantic Wax, See Photo | Bigg Boss Ex कंटेस्टेंट हितेने तेजवानी वाइफसोबत रोमँटिक व्हॅकेशन करतोय एन्जॉय,बघा फोटो
Bigg Boss Ex कंटेस्टेंट हितेने तेजवानी वाइफसोबत रोमँटिक व्हॅकेशन करतोय एन्जॉय,बघा फोटो
'बिग बॉस 11' चा प्रसिध्द कंटेस्टेंट हितेन तेजवानी हा फिनालेनंतर झालेल्या को-कंटेस्टेंटच्या पार्टीत अनुपस्थित होता. खरेतर, तो बिग बॉसमध्ये असल्यामुळे ब-याच दिवसापासून  कुटूंबापासून दूर होता.त्यामुळेच आता संपूर्ण वेळ तो कुटुंबाला देतोय.त्यांच्याबरोबर क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतोय. सध्या स्नो लँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय. त्याच्यासोबत पत्नी गौरी प्रधान आणि निवान-कात्या हे मुलंही आहेत. 

गौरी प्रधान आणि हितेन तेजवानी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. कुटुंब, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकांमधील त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तुम्हाला माहीत आहे का गौरीसोबत लग्न करण्याआधी हितेनचे पहिले लग्न झाले होते. हितेनचे हे पहिले लग्न अरेंज मॅरेज होते आणि हे लग्न केवळ ११ महिनेच टिकले होते. पहिले लग्न तुटण्यासाठी तोच कारणीभूत असल्याचे हितेन मानतो. हितेनचे लग्न तुटल्यानंतर काहीच महिन्यात गौरी त्याच्या आयुष्यात आली. गौरी आणि हितेनची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.गौरी आणि हितेनने कुटुंब या मालिकेच्या आधी ब्रीज साबणाच्या जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातीच्या वेळी ते एकमेकांशी सगळ्यात पहिल्यांदा बोलले होते.गौरी आणि हितेनने २९ एप्रिल २००३ला पुण्यात लग्न केले. त्यानंतर त्यांनी ९ मे २००३ला मुंबईत त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी रिसेप्शनची पार्टी दिली होती. 

 'बिग बॉस' मध्ये येण्यापुर्वी हितेन हा 'कुटुंब', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'पवित्र रिश्ता' आणि 'गंगा' मध्ये दिसला आहेत. 'पवित्र रिश्ता' वगळता सर्व शोजमध्ये गौरीसुध्दा त्याच्यासोबत होती. हे कपल 'नच बलिए 2', 'जोडी कमाल की' आणि 'कभी-कभी प्यार कभी-कभी यार' सारख्या रिअॅलिटी शोजमध्येही झळकले होते.बिग बॉसमध्ये एंट्री मारण्यापूर्वी हितेन तेजवानीने सिएनएक्समस्तीला खास मुलाखत दिली होती.त्यावेळी बिग बॉस शोचा हिस्सा बनणार असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला होता.जितके दिवस तो घरात राहणार खरा चेहराच रसिकांना पाहायला मिळेल असे त्यावेळी त्याने सांगितले होते.घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला निगेटीव्ह भूमिका साकारायची इच्छा असल्याचे त्याने सांगितले होते.

Web Title: Bigg Boss Ex Contestant Hits with Joy Tejwani Wife Enjoying Romantic Wax, See Photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.