हिंदी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ९चा विजेता प्रिन्स नरूला याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटंबातील एक व्यक्ती गमावला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कॅनडामध्ये वास्तव्यास असलेला प्रिन्सचा चुलत भाऊ रुपेश नरूला याचा मृत्यू झाला. रुपेशचा मृत्यू टोरंटो येथील स्कारबोरो येथे ब्लफर्स पार्क बीचवर बुडून झाला. रुपेश घरातून आपल्या मित्रांसोबत कॅनडा डे सेलिब्रेट करण्यासाठी गेला होता. तो टोरंटो येथील ब्लफर्स पार्क बीचवर मित्रांसोबत मजा मस्ती करत होता. दरम्यान, समुद्राच्या मोठ्या लाटा यायला सुरुवात झाली आणि रुपेश त्या लाटांमध्ये अडकला गेला.


टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार, रुपेशला पोहता येत नव्हतं तरी तो समुद्रात गेला होता. रुपेशचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. प्रिन्सचं संपूर्ण कुटुंब रुपेशच्या अंतिम संस्कारासाठी तातडीने कॅनडाला रवाना झाले आहेत.


प्रिन्सच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचं तर सध्या तो रोडीज रिएल हिरोजमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो आहे.

या शोमध्ये त्याच्यासोबत नेहा धुपिया, रणविजय सिंग, रफ्तार, निखिल चिनप्पा, संदीप सिंग सहभागी आहेत.

अशीही चर्चा आहे की प्रिन्स व युविका नच बलिएच्या आगामी सीझनमध्ये दिसणार आहेत. 

Web Title: Bigg Boss 9 winner Prince Narulas cousin Rupesh Narula drown in toronto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.