'Bigg Boss 14' which will start today, find out the full details of this show with one click | आज सुरु होणार 'Bigg Boss 14', सलमान खानच्या या शोची संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या एका क्लिकवर

आज सुरु होणार 'Bigg Boss 14', सलमान खानच्या या शोची संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या एका क्लिकवर

अखेर चाहत्यांची प्रेक्षका संपली आहे सगळ्यात विवादीत रिअ‍ॅलिटी 'बिग बॉस 14' काही वेळातच कलर्स चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोना काळात याशोमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. स्पर्धकांना अनेक गोष्टींच्या सुविधा घरात मिळणार आहेत. प्रत्येक सीझन प्रमाणेच बिग बॉस 14 चे सूत्रसंचालन देखील सलमान खानच करणार आहे. या शोमध्ये यावेळी नव्या स्पर्धकांसोबत बिग बॉसचे जुने स्पर्धकही दिसणार आहेत. त्यामुळे यावेळीचे बिग बॉस जास्त खास असणार आहे. यावेळी बिग बॉस 14 मध्ये  राधे माँ, रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, एजाज खान, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मलखानी, सारा गुरपाल, निक्की तंबोळी, राहुल वैद्य, पवित्रा पुनिया, जान कुमार शानू दिसणार आहेत. 3 ऑक्टोबरपासून सुरु होणारं बिग बॉस जानेवारी महिन्यापर्यंत चालणार आहे. रोज साडे दहा वाजता बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर शनिवार-रविवारी नऊ ते दहा वाजता या शोचे प्रसारण होणार आहे. 


सलमानला एका एपिसोडसाठी घेणार 20 कोटी
सलमान खानला 'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी देण्यात येणार मानधन हे प्रत्येकवेळी  चर्चेचा विषय असतो. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानला 20 कोटी एका एपिसोडसाठी देण्यात येणार आहे. पूर्ण सीझनसाठी 450 कोटींचे मानधन सलमानला मिळणार आहे. 

राधे माँ हाएस्ट पेड कंटेस्टेंट
राधे माँ या सीझनमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी स्पर्धक आहे. राधे माँ ला प्रत्येक आठवड्यासाठी 25 लाख दिले जाणार आहेत. स्वत:ला देव समजणारी राधे माँ ला या शोमध्ये बघण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत. 

सिद्धार्थ शुक्लाने घेतले किती मानधन?
मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या मेकर्सकडून सुद्धा सिद्धार्थने जबरदस्त रक्कम घेतली आहे. सलमानची फी नेहमीच चर्चेत असते पण यावेळी सिद्धार्थची फी देखील आश्चर्यचकित करणारी आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शुक्लाला प्रत्येक आठवड्यासाठी 35 ते 40 लाखांचे मानधन दिले जाणार आहे. अर्थात सलमान खानच्या मानधनासमोर हे मानधन काहीच नाही. पण टीव्ही अभिनेता म्हणून सिद्धार्थला मिळालेली रक्कम हैराण करणारी आहे. 

Bigg Boss 14चं घर आहे खूप आलिशान, फोटो पाहून व्हाल हैराण, See Photos

Bigg Boss 14 मध्ये धुमाकूळ माजवण्यासाठी येत आहेत हे सेलिब्रेटी, जाणून घ्या याबद्दल

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Bigg Boss 14' which will start today, find out the full details of this show with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.