bigg boss 14 talent manager pista dhakkar died in road accident crushed by vanity van | ‘बिग बॉस 14’ची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकडचे निधन, व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू

‘बिग बॉस 14’ची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकडचे निधन, व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू

ठळक मुद्देपिस्ता ही ‘बिग बॉस 14’ शो बनवणारी प्रॉडक्शन कंपनी एंडमोल शाइन इंडियात काम करत होती.

‘बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवरून एक दु:खद बातमी समोर येतेय. शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड हिचे एका  अपघातात दुर्दैवी निधन झाले. वीकेंड का वॉरच्या शूटींगनंतर हा अपघात झाला. 24  वर्षांच्या पिस्ताच्या निधनाने ‘बिग बॉस 14’च्या सेटवर शोककळा पसरली आहे. अनेक टीव्ही स्टार्सनी तिच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

पिस्ता ही कलर्सच्या प्रोग्रामिंग टीमची सदस्य होती आणि ‘बिग बॉस 14’मध्ये मुख्य असिस्टंट कोआॅर्डिनेटर म्हणून काम करत होती. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, फिल्म सिटीत हा अपघात झाला. ‘वीकेंड का वॉर’च्या शूटींगनंतर पिस्ता तिच्या दुचाकीने घरी परतत होती. रात्रीच्या अंधारात तिची स्कुटी स्लिप होऊन रस्त्यावरच्या खड्ड्यात गेली आणि यादरम्यान मागून आलेल्या व्हॅनिटी व्हॅनने तिला चिरडले. या अपघातात पिस्ता गंभीर जखमी झाली आणि अधिक रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

पिस्ता ही ‘बिग बॉस 14’ शो बनवणारी प्रॉडक्शन कंपनी एंडमोल शाइन इंडियात काम करत होती. बिग बॉसच नाही तर अन्य शोसाठीही तिने काम केले आहे. यात फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी, द व्हॉईसचा समावेश आहे.
पिस्ताच्या निधनावर विकास शर्मा, हिमांशी खुराणा, देवोलिना भट्टाचार्यजी, काम्या पंजाबी, प्रिंस नरूला आदींनी शोक व्यक्त केला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss 14 talent manager pista dhakkar died in road accident crushed by vanity van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.