'बिग बॉस' शो सोडण्याच्या तयारीत होता सलमान खान, कारण वाचून व्हाल हैराण

By गीतांजली | Published: October 1, 2020 01:12 PM2020-10-01T13:12:02+5:302020-10-01T13:21:29+5:30

टीव्हीवरील सगळ्यात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 14' 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

Bigg boss 14 salman khan want to quit at one point reason | 'बिग बॉस' शो सोडण्याच्या तयारीत होता सलमान खान, कारण वाचून व्हाल हैराण

'बिग बॉस' शो सोडण्याच्या तयारीत होता सलमान खान, कारण वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

टीव्हीवरील सगळ्यात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 14' 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भाईजानचे फॅन्स त्याला स्क्रिनवर बघण्यासाठी खूपच आतुर आहेत. जवळपास बिग बॉसच्या सगळ्या सीझनचे सूत्रसंचालन सलमान खाननेच केले आहे. पण एकवेळ अशी आली होती की सलमान खानला बिग बॉस सोडायचे होते. बिग बॉस 14 सुरु होण्याला अवघे 2 दोन बाकी आहेत.  बिग बॉस म्हटलं की सलमान खान असं समीकरण गेल्या कितीतरी सीझनपासून झाले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, त्याला बिग बॉस सोडायचे होते. एकवेळ अशी आली होती जेव्हा सलमानला खूप ट्रोल केले जायचे.असे म्हटले जात होते की शो दरम्यान सलमान खान स्पर्धकांच्या आयुष्यात खूप हस्तक्षेप करतो. याच कारणामुळे तो ट्रोलर्सचा शिकार होतो.  टोलर्सला हैराण होऊन सलमानला बिग बॉस सोडायचा होता. पण असे असले तरी. ट्रोलर्स पेक्षा चाहत्यांकडून मिळणार प्रेम हे कितीतरी जास्त आहे म्हणून सलमान म्हणाला मी हा शो सोडू शकलो नाही.

बिग बॉस 14 चे सूत्रसंचालन देखील सलमान खानच करणार आहे. सलमान खानला 'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी देण्यात येणार मानधन हे प्रत्येकवेळी  चर्चेचा विषय असतो. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानला 20 कोटी एका एपिसोडसाठी देण्यात येणार आहे. पूर्ण सीझनसाठी 450 कोटींचे मानधन सलमानला मिळणार आहे. 

हे लोक जाऊ शकतात बिग बॉसच्या घरात
रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मलखानी, सारा गुरपाल, निक्की तंबोळी, राहुल वैद्य, शार्दुल पंडित, शहजाद पोल, पवित्रा पुनिया, नैना सिंग, प्रतीक सहजल स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री घेऊ शकतात. 

Web Title: Bigg boss 14 salman khan want to quit at one point reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.