Bigg Boss 14: Rakhi Sawant tries to pull Abhinav Shukla's pants down | राखी सावंतने लांघल्या सगळ्या मर्यादा, कॅमेऱ्यासमोर अभिनव शुक्लाची पँट उतरवण्याचा केला प्रयत्न, पाहा हा व्हिडिओ

राखी सावंतने लांघल्या सगळ्या मर्यादा, कॅमेऱ्यासमोर अभिनव शुक्लाची पँट उतरवण्याचा केला प्रयत्न, पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देया प्रोमोत राखी अभिनवची पँट खेचताना दिसत आहे. राखीने केलेल्या या चमत्कारिक प्रकारामुळे अभिनव देखील शॉकमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

बिग बॉस १४ मध्ये आपल्याला आतापर्यंतच्या सिझनमध्ये दिसलेले काही सेलिब्रेटी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये झळकत आहे. पूर्वीच्या सिझनमध्ये राखीमुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे.

बिग बॉसच्या घरात असताना राखी पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. राखी अभिनव शुक्लाच्या प्रेमात पडली आहे. अभिनवचे लग्न झालेले असून त्याची पत्नी रुबीना दिलाईक देखील बिग बॉसच्या घरात त्याच्यासोबत आहे. राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटले जाते. ती बिग बॉसच्या घरात देखील ड्रामा करताना दिसत आहे. ती अभिनवच्या सतत मागे पुढे करत असते. पण आता तर राखीने सगळ्याच मर्यादा लांघल्या आहेत. कारण कलर्स वाहिनीच्या सोशल मीडियावर बिग बॉसचा आपल्याला नवा प्रोमो पाहायला मिळत आहे. या प्रोमोत राखी अभिनवची पँट खेचताना दिसत आहे. राखीने केलेल्या या चमत्कारिक प्रकारामुळे अभिनव देखील शॉकमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. राखीच्या या वागण्यामुळे अभिनवची पत्नी रुबिना तर प्रचंड चिडली असून तू तुझ्या मर्यादेत राहा... असे रुबिना राखीला सुनावताना दिसत आहे. 

अभिनव गार्डन एरियात सोफ्यावर बसलेला असताना राखी त्याच्या जवळ येऊन बसलेली दिसत आहे. त्यावर कंटाळून अभिनव दुसऱ्या सोफ्यावर बसायला जात आहे. पण पुन्हा राखी त्याच्या मागे मागे जाताना दिसत आहे आणि अचानक अभिनवने घातलेल्या शॉर्टचे इलास्टिक खेचताना दिसत आहे. हे सगळे पाहुन रुबिना चिडलेली दिसत आहे.

राखी सावंत सध्या बिग बॉसच्या घरात मनोरंजनाच्या नावावर अक्षरश: धुमाकूळ घालतेय. काही दिवसांपूर्वीच वीकेंड का वॉरमध्ये याच कारणासाठी सलमान खानने राखी सावंतला झापले होते. एका एपिसोडमध्ये राखीने डबल मीनिंग व वल्गर कमेंट पास केली होती. अली गोनीने तिच्या या कमेंटवर आक्षेप घेतला होता. वीकेंडच्या वॉरमध्ये यावरून सलमानने राखीचा क्लास घेतला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14: Rakhi Sawant tries to pull Abhinav Shukla's pants down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.