Bigg Boss 14: Rakhi Sawant Takes Bath With The Help Of Rahul Vaidya Video Viral | पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! राहूल वैद्यने घातली राखी सावंतला आंघोळ, Video Viral

पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! राहूल वैद्यने घातली राखी सावंतला आंघोळ, Video Viral

'बिग बॉस १४' मधून मराठमोळा गायक सध्या चर्चेत आहे. यावेळी त्याचा अंदाज पूर्णपणे वेगळा दिसत आहे. आधीचा राहुल हाच होता का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. शोमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी राहुल वैद्य प्रचंड मेहनत करत आहे. सतत लाइमलाइटमध्ये राहत तो चाहत्यांची पहिली पसंती बनण्यासाठी स्ट्रगरल करत असल्याचे पाहायला मिळतंय.

 

चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत तो लक्ष वेधून घेत आहे. म्हणूनच की काय, राखी सावंतलाही आंघोळ घालण्याचे काम राहुल वैद्यनेच पार पाडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून थोडे आश्चर्य वाटत असून पब्लिसिटी स्पर्धक काहीही करायला तयार आहेत हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे चर्चा आहेत.  काहींना त्याचा हा अंदाज आवडत आहे तर काहींना फारसा रुचला नाहीय.

 

शोमध्ये स्पर्धकही अनेकवेळा राहुल वैद्यला टार्गेट करताना दिसतात. शोची स्पर्धक निक्की तांबोळीनेदेखील राहुल वैद्यविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. राहुल महिलांचा सन्मान करत नाही त्याला महिलांसोबत कसे बोलायचे ते कळत नाही असे ती म्हणाली होती.

अभिनयात सुद्धा राहुलने आजमावले नशीब सोनू निगम, मीका सिंग आणि शानसारखे राहुल वैद्यने सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत.


बिग बॉसच्या घरात एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली गेली. मीडियाच्या पत्रकारांनी घरातील सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नेहमीप्रमाणे या एपिसोडचे आकर्षण ठरली ती राखी सावंत. ‘मीडिया की बेटी’ मानल्या जाणा-या राखीने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेच दिली नाही तर आपल्या उत्तराने सर्वांचे मनोरंजनही केले.तुझ्या लग्नाची इतकी चर्चा का होते? तू खरंच लग्न केले की हा सगळा ड्रामा आहे? असा प्रश्न राखीला यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राखीने कधी नव्हे असा खुलासा केला. होय, तिच्या या खुलाशाने सगळ्यांना धक्का बसला. मी विवाहित आहे आणि पतीची प्रतीक्षा करत आहे. माझ्या आयुष्यात काही अडचणी होत्या आणि म्हणून मला लग्न करावे लागले असे राखी म्हणाली. पुढे तिने जे काही सांगितले ते ऐकून तर सगळेच हैराण झालेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14: Rakhi Sawant Takes Bath With The Help Of Rahul Vaidya Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.