Bigg boss 14 radhe maa entry salman khan show video viral | बिग बॉस 14: सलमान खानच्या शोमध्ये 'राधे मां'चे जाणं कन्फर्म, समोर आला पहिला व्हिडीओ

बिग बॉस 14: सलमान खानच्या शोमध्ये 'राधे मां'चे जाणं कन्फर्म, समोर आला पहिला व्हिडीओ

सलमान खानचा शो 'बिग बॉस 14'मध्ये राधे मां ची एंट्री होणार अशी मागील किती तरी दिवसांपासून चर्चा होती. बिग बॉसचा भाग राधे मां व्हावी अशी निर्मात्यांची इच्छा आहे. गेल्या वर्षीही राधे मां ला मेकर्स नी अप्रोच केले होते अखेर यावर्षी स्पर्धक म्हणून ती या शोमध्ये सहभागी झाली. 3 ऑक्टोबरपासून बिग बॉस सुरु होणार आहे. 

समोर आला प्रोमो व्हिडीओ
कलर्स चॅनलने आपल्या ट्विटर हँडलरवर आज (मंगळवारी) एक प्रोमो रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये राधे मां बिग बॉसच्या घरात जाताना दिसते आहे. मात्र राधे मां चा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. राधे माँचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बिग बॉसला घेऊन लोकांमधील उत्सुकता वाढली  आहे.


सुखविंदर कौरची लोकप्रियता वाढत गेली
सुखविंदर कौर उर्फ राधे मां चा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. लहान वयात तिने आधात्मचा मार्ग धरला. स्वत: ला देव म्हणवणारे राधे मां, गुरु मां चॅरिटेबल ट्रस्ट चालवते.

हे लोक जाऊ शकतात बिग बॉसच्या घरात
बता दें कि रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मलखानी, सारा गुरपाल, निक्की तंबोळी, राहुल वैद्य, शार्दुल पंडित, शहजाद पोल, पवित्रा पुनिया, नैना सिंग, प्रतीक सहजल स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री घेऊ शकतात. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg boss 14 radhe maa entry salman khan show video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.