Bigg Boss 14: fans gets irritated with nikki tamboli voice compared to rakhi sawant | Bigg Boss 14: निक्की तू मत बोल वरना...! बिग बॉसच्या घरात ‘हिला’ पाहून चाहत्यांना आठवली राखी सावंत 

Bigg Boss 14: निक्की तू मत बोल वरना...! बिग बॉसच्या घरात ‘हिला’ पाहून चाहत्यांना आठवली राखी सावंत 

ठळक मुद्देनिक्की तांबोळी साऊथची एक मोठी स्टार आहे. निक्की ही महाराष्ट्राच्या औरंगाबादची राहणारी आहे.

बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोचा 14 वा सीझन अखेर सुरु झाला.  काल शोच्या ग्रँड प्रीमिअरमध्ये सलमान खाननेबिग बॉसच्या सर्व स्पर्धकांची ओळख करून दिली. अनेक बदलांसह शो सुरु झाला आणि पाठोपाठ चर्चाही सुरु झाल्यात. तूर्तास सर्वाधिक चर्चा होतेय ती, बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारी साऊथ अभिनेत्री निक्की तांबोळीची. साऊथची ही बोल्ड बाला पहिल्याच दिवशी चर्चेत आली. अगदी सोशल मीडियावरही तिची चर्चा रंगली. का तर तिचा आवाज.

होय, निक्कीच्या आवाजाने बिग बॉसच्या प्रेक्षकांना असे काही इरिटेड केले की, तिला पाहून अनेकांना राखी सावंतची आठवण झाली. निक्कीचा आवाज ऐकून माझ्या कानातून रक्त वाहू लागलेय, अशा काय काय प्रतिक्रिया नेटक-यांनी सोशल मीडियावर दिल्यात.

‘दरवर्षी बिग बॉस आमच्यावर इतके अत्याचार का करतो? वारंवार त्या निक्कीचा आवाज म्यूट करावा लागतोय,’ असे एका युजरने लिहिले.

तर निक्की म्हणजे सना आणि राखी सावंतचे मिक्चर असल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली. निक्की तू मत बोल वरना मैं अब बेहोश हो जाऊंगी, असे एका चाहतीने लिहिले.  

निक्कीवरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

निक्की तांबोळी कोण आहे?
निक्की तांबोळी साऊथची एक मोठी स्टार आहे. निक्की ही महाराष्ट्राच्या औरंगाबादची राहणारी आहे. येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर निक्की मॉडेलिंगकडे वळली. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केल्यानंतर ती टीव्हीच्या अनेक जाहिरातींमध्ये झळकली. यानंतर Chikati Gadilo Chithakotudu या तेलगू सिनेमातून तिने चित्रपटांत एन्ट्री घेतली. राघव लॉरेन्स यांच्या ‘कंचना 3’ या चित्रपटातून तिने तामिळ सिनेमात डेब्यू केला. निक्की तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती सर्रास स्वत:चे बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Bigg Boss 14 Premiere: बिग बॉस १४ची दमदार सुरुवात; जाणून घ्या या सीझनमध्ये कोणाकोणाचा सहभाग

Bigg Boss 14चं घर आहे खूप आलिशान, फोटो पाहून व्हाल हैराण, See Photos

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14: fans gets irritated with nikki tamboli voice compared to rakhi sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.