bigg boss 14 fame nikki tamboli brother passes away due to corona | ‘बिग बॉस 14’ फेम निक्की तंबोलीवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे भावाचे निधन

‘बिग बॉस 14’ फेम निक्की तंबोलीवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे भावाचे निधन

ठळक मुद्देमाझ्या भावासाठी प्रार्थना करा, अशी विनंती अलीकडे निक्कीने चाहत्यांना केली होती. भावासाठी तिने घरी होमहवनही केले होते.

‘बिग बॉस 14’मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय, ज्या भावावर निक्की जीव ओवाळायची तो भाऊ आज या जगात नाही. निक्कीचा 29 वर्षांचा भाऊ जतिन तंबोलीचे याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याने अखेरचा श्वास घेतला.
जतिनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याआधी कुठल्याशा इंफेक्शनमुळे त्याला मुंबईच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्याला कोरोना झाला. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत गेली आणि अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

माझ्या भावासाठी प्रार्थना करा, अशी विनंती अलीकडे निक्कीने चाहत्यांना केली होती. भावासाठी तिने घरी होमहवनही केले होते. निक्कीने ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये जावे, अशी तिच्या भावाची भरून इच्छा होती. भावाच्या या इच्छेखातर निक्कीने ही आॅफरही स्वीकारली होती. फक्त भाऊ बरा होऊन घरी परतावा, अशी निक्कीची इच्छा होती. पण आता तिची ही इच्छा कधीच पूर्ण होणारी नाही. भावाच्या निधनाने निक्की पूर्णपणे कोलमडली आहे.

शेअर केली भावुक पोस्ट
निक्कीने भावाच्या निधनाची बातमी शेअर करत, भावुक पोस्ट लिहिली. तिने लिहिले, आज सकाळी देव तुझ्या नावाचा पुकारा करणार आम्हाला माहित नव्हते. आम्ही तुझ्यावर प्रचंड प्रेम केले आणि ते करत राहू.  तू एकटा गेलेला नाहीस. तुझ्यासोबत आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एक भाग देखील गेला आहे. आम्ही तुला पाहू शकत नाही पण तू नेहमी आमच्यासोबत आहेस, असशील...तुझ्यासारखा भाऊ मला दिला, याबद्दल मी देवाचे नेहमी आभार मानेल... आपण पुन्हा नक्की भेटू...

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss 14 fame nikki tamboli brother passes away due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.