शहनाज गिलच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. पंजाबची कॅटरिना म्हणून ओळखली जाणारी शहनाज बिग बॉस शोमुळेच लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.या मध्ये ती वेगळ्या लुकमध्ये दिसेतय. 

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन तिने तिचे वजन कमी करत स्लिम शरिरयष्टी बनवली आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्यामुळेच शहनाज आज इतकी फिट आणि सुंदर दिसत आहे.


मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत नेहमीच पाहायला मिळतं. मेकओव्हर केल्यानंतर लगेचच कामाचा बडा प्रोजेक्ट हाती लागला तर सोने पे सुहागाच. हेच कदाचिद शहनाजबरोबरही घडले असावे तिच्या या  मेकओव्हरमुळे तिचे नशीबाचे दरवाजे उघडतील आणि लवकरच बड्या प्रोजेक्टमध्ये नवीन अंदाजात रसिकांच्या भेटीला आल्यास आश्चर्य वाटायला नको.

शहनाजनेही केलाय डिप्रेशनचा सामना, आत्महत्या करण्याचाही केला होता प्रयत्न

ऑनस्क्रीन सा-यांना खळखळून हसवणारी शहनाज मात्र कधी काळी डिप्रेशनमध्येही गेली होती. इतकेच नव्हेतर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. खुद्द तिच्या वडिलांनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे. हिमांशी खुरानासह झालेल्या वादामुळे शहनाज डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी सगळ्याच गोष्टी तिला निर्थक वाटू लागल्या होत्या. आयुष्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 13's Shehnaz Gill is experimenting with her styling post transformation; see her glamorous pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.