छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित आणि वादग्रस्त असलेल्या शो असलेल्या ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार एक कार्यक्रमाच्या ठिकाणी बिग बॉसची एक्स विजेती श्वेता तिवारी आली होती. यावेळी तिला बिग बॉस 13 संबंधीत प्रश्न विचारण्यात आले. यावर श्वेताने जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. श्वेता म्हणाली, ''माझ्याकडे बिग बॉस बघायला वेळ नाही. दुसरीकडे मला मुलं आहेत आणि त्यांच्यासोबत बसून मी हा शो नाही बघू शकतं. कारण रेयांशसमोर जर कुणी मोठ्या आवाजात बोलले तर तो घाबरून जातो आणि तसाही तो कार्टून बघत असतो त्यामुळे कुणालाच टीव्ही बघायला मिळत नाही. ''


 गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन ती चर्चेत आली होती.  श्वेताने पती अभिनव कोहली विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर अभिनवला अटक करून सोडून देण्यात आले होते. तर अभिनवच्या आईने त्याच्यावर लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचे सांगत ती ही सगळं अभिनवपासून सुटका मिळवण्यासाठी करत असल्याचे सांगितले होते..


 श्वेता  लवकरच छोट्या पडद्यावर परतते आहे. ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत श्वेता मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पण श्वेताची ही मालिका ऑन एअर होण्यापूर्वीच वादात सापडली आहे.  अभिनेत्री व पंजाबी चित्रपट निर्माती प्रीती सप्रू यांनी ‘मेरे डॅड की दुल्हन’चे निर्माते टोनी व दीया सिंग यांना कोर्टात खेचले आहे. प्रीतीने ‘मेरे डॅड की दुल्हन’च्या निर्मात्यांवर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. माझ्या ‘तेरी मेरी गल बन गई’ या आगामी पंजाबी चित्रपटाचा कॉन्सेप्ट चोरून निर्मात्यांनी ‘मेरे डॅड की दुल्हन’ मालिका बनवली, असाही तिचा आरोप आहे.

Web Title: Bigg boss 13 shweta tiwari not watching current season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.