Bigg Boss 13 Fame A mountain of sorrow fell on Hindustani Bhau, mother's lost umbrella | बिग बॉस १३ फेम हिंदुस्तानी भाऊवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचे हरविले छत्र

बिग बॉस १३ फेम हिंदुस्तानी भाऊवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचे हरविले छत्र

बिग बॉस १३चा कंटेस्टंट आणि युट्यूबर हिंदुस्तानी भाऊच्या आईचं निधन झाले आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. हिंदुस्तानी भाऊने बिग बॉस १३मध्ये आपल्या गदर अंदाजातून लोकप्रियता मिळवली होती. हिंदुस्तानी भाऊ राजकारण आणि देशातील मुद्द्यांवर आपले बेधडक मत मांडत असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा तो वादाच्या भोवऱ्यात अडकतो. त्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळाली होती. हिंदुस्तानी भाऊच्या आईचे निधन झाल्याचे समजते आहे. हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास कुमार फाटक आपल्या आईच्या खूप जवळ होता. बिग बॉसच्या घरातही तो आपल्या आई आणि कुटुंबाला मिस करत होता. आईच्या निधनामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिंदुस्तानी भाऊच्या आईच्या निधनाचे कारण समजू शकलेले नाही. यादरम्यान हिंदुस्तानी भाऊच्या आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत हिंदुस्तानी भाऊ आपल्या आईला किस करताना दिसतो आहे. हा फोटो हॉस्पिटलमधील दिसतो आहे.


लेटेस्टली हिंदीच्या रिपोर्टनुसार हिंदुस्तानी भाऊचा वकील अली काशिफ खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, काल रात्री हिंदुस्तानी भाऊच्या आईचे निधन झाले आहे. रिपोर्टनुसार याबद्दल माहिती देताना वकील अली काशिफ खान यांनी हेदेखील सांगितले की, त्याच्या आईच्या निधनामुळे कोर्टात हजेरी लावू शकला नव्हता. एकता कपूरच्या विरोधात सुरू असलेल्या कायदेशीर वादावर त्याला कोर्टात हजेरी लावायची होती. पण हजर राहू शकला नाही. हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरची वेबसीरिज ट्रिपल एक्समध्ये भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 13 Fame A mountain of sorrow fell on Hindustani Bhau, mother's lost umbrella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.