Big boss2 fame abhijeet bichukale and Surekha Punekar in don special | दोन स्पेशलमध्ये पुन्हा रंगणार बिग बाॅसचा डाव, बिचकुलेला भारी पडणार सुरेखा पुणेकर
दोन स्पेशलमध्ये पुन्हा रंगणार बिग बाॅसचा डाव, बिचकुलेला भारी पडणार सुरेखा पुणेकर

कलर्स मराठीवर दोन स्पेशल कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे... सगळ्यांनाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यात हळूच डोकावून बघायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते. ही मंडळी त्यांच्या खर्‍या आयुष्यात कशा आहेत, त्यांची सुख - दु:ख, भावुक करणार्‍या गोष्टी, त्यांचा इथवरचा प्रवास कसा होता, या मंडळी प्रसिद्धीच्या शिखरावर कसे बरे पोहचले असतील ? आणि बरच काही... दोन स्पेशल या आठवड्याच्या भागामध्ये बिग बॉस मराठी सिझन 2 चे सदस्य येणार आहेत.

या सिझनमध्ये आलेला अभिजीत बिचुकले कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहिला. या घरात त्याच्यासोबत सुरेखा पुणेकरसुद्धा आहे. दोन स्पेशलमध्ये अभिजीत बिचुकले आणि सुरेख पुणेकर यांच्यात खडाजंगी दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात देखील दोघांमधले वाद आपण अनेकवेळा बघितले होते. तिच वादा-वादी पुन्हा एकदा आपल्याला दोन स्पेशलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा वाद आता कुठेपर्यंत जाणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरेंच्या विरोधात विभानसभा निवडणुकीत उभे राहून चर्चेत आला होता.

Web Title: Big boss2 fame abhijeet bichukale and Surekha Punekar in don special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.