Bidaai Actress Sara khan Apologizes For Her Controversial Comment | 'बिदाई' अॅक्ट्रेस सारा खानला अखेर मागावी लागली माफी, Video केला शेअर
'बिदाई' अॅक्ट्रेस सारा खानला अखेर मागावी लागली माफी, Video केला शेअर

छोट्या पडद्यावर सपना बाबुल का बिदाई ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेत्री सारा खान हिने सा-यांची मनं जिंकली होती. साराच्या अभिनयासह तिच्या अदाही रसिकांना भावल्या होत्या.मालिका बंद झाल्यानंतर ती बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यामुळे जास्त चर्चेत आली. विशेष म्हणजे तिचा विवाहसोहळाही याच शोमध्ये ऑनस्क्रीन रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सध्या ती तिच्या करिअरपेक्षा इतर वादग्रस्त गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अलीकडेच 'ब्लॅकहार्ट' या गाण्याच्या लाँचवेळी तिने ट्रोलर्सना शिवीगाळ केली होती. आता तिने सोशल मीडियावरही एक व्हिडिओ शेअर करुन माफी मागितली आहे. या व्हिडिओत सारा म्हणतेय की, तिचे शब्द आणि बोलण्याची पद्धत चुकीची होती, पण तिचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. चुक की मनुष्याकडूनच होते, त्यामुळे मी माफी मागतेय, असेही ती या व्हिडिओत म्हणाली.


आता साराप्रमाणेच तिची बहिण छोट्या पडद्यावरील रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. साराची बहिण आर्यानेहीअभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.एकता कपूर 'कसौटी जिंदगी की २'मालिकेत झळकत आहे. या मालिकेतून आर्या आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. मोठी बहिण साराप्रमाणेच आर्यासुद्धा हॉट, बोल्ड आहे. काही महिन्यांपूर्वी आर्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. त्यावेळी केलेल्या धम्माल मस्तीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यांत तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. सप्टेंबर महिन्यात 'कसौटी जिंदगी की- २' हा शो रसिकांच्या भेटीला आला असून सात वर्षांनंतर एकता कपूर हा शो नव्या स्टारकास्टसह पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. 

Web Title: Bidaai Actress Sara khan Apologizes For Her Controversial Comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.