'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम पहिल्यांदाच झळकणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 08:16 PM2019-08-07T20:16:37+5:302019-08-07T20:16:54+5:30

विनोदवीर भाऊ कदम एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाला आहे.

Bhau Kadam first time seen in god Kamdeo role in webseries | 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम पहिल्यांदाच झळकणार या भूमिकेत

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम पहिल्यांदाच झळकणार या भूमिकेत

googlenewsNext

चला हवा येऊ द्या फेम विनोदवीर भालचंद्र उर्फ भाऊ कदम आपल्या विनोदाची जादू डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांवर करण्यासाठी सज्ज झाला आहे. हंगामाच्या नव्या रिजनल ओरिजनल श्री कामदेव प्रसन्न या मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला भाऊ कदम या नव्या विनोदी मालिकेत प्रणयाची देवता कामदेवाची भूमिका साकारणार आहे.

खऱ्या प्रेमाच्या शोधात फिरणाऱ्या मिलिंद (सागर कारंडे) या माणसाला आणण्यासाठी कामदेव (भाऊ कदम) पृथ्वीतलावर अवतरतात असं या मालिकेचं कथानक आहे. या विनोदवीर जोडगोळीच्या उत्कृष्ट अभिनयाची मजा, या कथानकातील अनेक चढ-उतार आणि मिलिंदच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी या दोघांनी योजलेल्या क्लृप्त्या याच्यामुळे मालिका प्रेक्षकांना बांधून ठेवेल. या मालिकेत मिलिंदचं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं ते पाहताना मजा येईल.


कामदेवाची भूमिका करतानाचा आनंद व्यक्त करताना भाऊ कदम म्हणाला, ''मी आतापर्यंत आयुष्यात केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. त्यामुळे ऑन-स्क्रीन कामदेवाची भूमिका करताना विशेष मजा आली. दैनंदिन आयुष्यातील विनोदी घटनांवर प्रकाश टाकून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही विनोदी मालिका आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याची मला उत्सुकता आहे.''


'श्री कामदेव प्रसन्न' ही मालिका मराठीत दाखवली जाणार असून त्यामध्ये सागर कारंडे, भाग्यश्री मोटे, विनय येडेकर आणि आशा शेलार यांच्यासारखे मराठीतील नावाजलेले कलाकार काम करणार आहेत.

हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठी यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, संदीप नवरे यांनी दिग्दर्शन केले आहे. लवकरच ही मालिका हंगामा प्‍लेवरून स्ट्रीम केली जाईल.

Web Title: Bhau Kadam first time seen in god Kamdeo role in webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.