Bharti Singh’s Romantic Date with Ravi Kishan | भारती सिंग गेली रवि किशनसोबत डेटवर?
भारती सिंग गेली रवि किशनसोबत डेटवर?

'खतरा खतरा खतरा'मध्ये प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे पाहुणे पहायला मिळतात आणि ते रसिकांचे तुफान मनोरंजन करतात. या आठवड्यात कॉमेडीचा तडका देण्यासाठी भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशनला आमंत्रित करण्यात आले होते. त्याच्या उपस्थितीने मनोरंजनाचा डबल धमाकाचा पाहायला मिळणार हे मात्र नक्की.  जेव्हा कॉमेडी क्वीन भारती सिंगने रवि किशनला तिच्या बरोबर स्पेशल डेटवर जायला आवडेल असे सांगताच  रवि किशन भारतीला नकार देऊ शकला नाही. सेटवरच रवि किशनने भारतीची ही इच्छा पूर्ण केली .शोच्या स्टेजवर  डेट साठी एक रोमँटिक कँडल लाइट डिनरचे आयोजन करण्यात आले आणि त्यात भारती आणि रवि यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांची बरसात करण्यात आली, तेव्हा भारती खूप लाजली.


 
नंतर, रविने हसत हसत सांगीतले की भारतीने खतरा खतरा खतरा वर येण्यासाठी त्याला खूप फोर्स केला होता. कारण तिच्या लग्नाला तो उपस्थित राहिला नव्हता म्हणून तिला त्याच्यावर प्रँक्स करून सूड  घ्यायचा होता. ट्रॅम्पोलिन हेड बास्केट गेम, वूबल बॅलन्स कोन्स आणि स्लायडिंग क्लॉथ गेम यासारखे खेळ खेळण्याचा रविने खूप आनंद लुटला.  

खतरा खतरा खतरा वरील त्याच्या अनुभवा विषयी बोलताना रवि म्हणाला, “हा कॉमेडीमध्ये बेस्ट शों पैकी एक आहे आणि त्यात सहभागी होण्याचा मला आनंद आहे. माझा मुलगा या शोचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याला जेव्हा कळाले की मी एका एपिसोडमध्ये सहभागी होणार आहे तेव्हा त्याला खूप आनंद झाला. भारती आणि हर्षला मी खूप वर्षांपासून ओळखतो आणि मला शो वर खूप मजा आली.”

Web Title: Bharti Singh’s Romantic Date with Ravi Kishan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.