Bharti Singh complaints about Harsh to brother Mika Singh | आणि भारती सिंगने मिका सिंगला केली पती हर्ष लिंबाचियाची तक्रार

आणि भारती सिंगने मिका सिंगला केली पती हर्ष लिंबाचियाची तक्रार

ठळक मुद्देआपल्या या भावाकडे चक्क आपल्या पतीची म्हणजेच हर्ष लिंबाचियाची तक्रार केली. हर्ष या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत फ्लर्टिंग करतो असे तिने मिका सिंगला सांगितले. मिकाने देखील खऱ्या भावाप्रमाणे बहिणीची बाजू घेतली आणि हर्षला शिक्षा करण्याचे ठरविले

गंमती आणि मनोरंजनासह कठीण टास्क करण्यापर्यंत, आपण आपल्या लाडक्या टेलिव्हिजन स्टारच्या अनेक मनोरंजक छटा कलर्सच्या खतरा खतरा खतरा मध्ये पाहिल्या आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून खतरों के खिलाडी या कार्यक्रमातील अनेकजण या कार्यक्रमात दिसत असून ते प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत.

View this post on Instagram

#KhataraKhatara #Comedy

A post shared by Colors TV (@colorstv) on

आता खतरा खतरा खतरा या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड मध्ये एक खास पाहुणा हजेरी लावणार आहे. गायक मिका सिंग या कार्यक्रमात दिसणार असून तो या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसोबत चांगलीच धमाल मस्ती करणार आहे. या कार्यक्रमातील सगळे स्पर्धकदेखील त्याला पाहून खूप खूश होणार आहेत. 

भारती सिंग ही सर्व स्पर्धकांमधील सगळ्यांची आवडती स्पर्धक असून तिला तिच्या भावाला म्हणजेच मिका सिंगला भेटण्याचा जास्त आनंद झाला होता. तिने मिकाला भाऊ मानताच त्याने आता भावाची कर्तव्ये देखील पार पाडावीत असे तिने त्याला सांगितले आणि आपल्या या भावाकडे चक्क आपल्या पतीची म्हणजेच हर्ष लिंबाचियाची तक्रार केली. हर्ष या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत फ्लर्टिंग करतो असे तिने मिका सिंगला सांगितले. मिकाने देखील एखाद्या खऱ्या भावाप्रमाणे बहिणीची बाजू घेतली आणि हर्षला शिक्षा करण्याचे ठरविले. त्याने हर्षला एका फिरत्या शू व्हील समोर उभे राहायला सांगितले. हे व्हील त्याला सतत लागणार अशी देखील चेतावणी त्याला दिली. भारती यामुळे अतिशय आनंदित झाली. पण तिने नंतर उघड केले की असे काहीही नाहीये. तिला केवळ हर्षला त्रास द्यायचा होता. याविषयी मिका सांगतो, “खतरा खतरा खतरा हा टेलिव्हिजन वरील माझ्या आवडत्या शो पैकी एक आहे. हास्याचा आनंद आपण सर्वजण घेत असतो आणि या शो मधून तेच दिले जाते. या शो वरील प्रत्येकजण करत असलेले काम मला आवडते. या मनोरंजक शो मध्ये सहभागी होत असल्याचा मला आनंद होत आहे.”

खतरा खतरा खतराचा हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रत्येक सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता फक्त कलर्सवर पाहायला मिळतो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bharti Singh complaints about Harsh to brother Mika Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.