भाभीजी घर पर है फेम शुभांगी अत्रे उर्फ अंगुरी भाभीने नुकतेच तिचे टिकटॉक अकाऊंट डिलीट केले आहे. शुभांगी लोकल कॅपेनला सपोर्ट करते आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार शुभांगी म्हणाली, हे खरे आहे की हे एक लोकप्रिय माध्यम आहे आणि हे भविष्यात प्रमोशन एक्टिव्हिटीसाठी वापर होऊ शकतो. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहून हे अॅप वापरणार नाही. मला आशा आहे की इतर लोक याला डिलीट करतील आणि स्थानिक प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करतील.

भाभीजी घर पर हैं’ या लोकप्रीय शोमधून शिल्पा शिंदे एक्झिट घेतली आणि तिच्या जागी नवी अंगुरी भाभी म्हणून शुभांगीची वर्णी लागली. शिल्पाने मालिका सोडल्यानंतर टीआरपीमध्येही घसरण झाली होती.

पण शुभांगी अंगूरी भाभीच्या भूमिकेत झळकल्यानंतर अल्पावधीतच ती रसिकांच्या पसंतीस उतरली. शुभांगीने कस्तूरी , चिड़िया घर , दो हंसों का जोड़ा, हवन, अधूरी कहानी हमारी सारख्या मालिकांमधून काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhabiji ghar par hain fame shubhangi atre quits tiktok account gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.