ठळक मुद्देशुभांगी अंगूरी भाभीच्या भूमिकेत झळकल्यानंतर अल्पावधीतच ती रसिकांच्या पसंतीस उतरली. शुभांगीने  कस्तूरी , चिड़िया घर , दो हंसों का जोड़ा, हवन, अधूरी कहानी हमारी सारख्या मालिकांमधून काम केले आहे.  

भाभीजी घर पर है’ या लोकप्रीय शोमधली अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, शुभांगीचे बोल्ड फोटोशूट.  ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत कायम साडीमध्ये दिसणारी अंगूरी भाभी या फोटोशूटमध्ये मात्र ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. साहजिकच, काहींनी हे बोल्ड फोटोशूट पाहून तिचे कौतुक केले आहे तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.


या फोटोशूटमधील एका फोटोत शुभांगीने पांढ-या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची हॉट पॅन्ट घातली आहे. चाहत्यांनी नेमका हा फोटो पाहिला आणि शुभांगीला ट्रोल करणे सुरु केले. आता या फोटोत असे काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शुभांगीच्या शर्टवरची प्रिंट. होय, या शर्टवर वृत्तपत्राची प्रिन्ट आहे. लोकांनी तिला हा फोटो पाहिला आणि तू न्यूजपेपर अंगात घातला आहेस का? असा सवाल करणे सुरु केले.


 शुभांगी खºया आयुष्यात ग्लॅमरस राहते. स्वत:चे अनेक ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंवरून शुभांगी अनेकदा ट्रोल होते. पण या ट्रोलर्सकडे शुभांगी अजिबात लक्ष देत नाही.

‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रीय शोमधून शिल्पा शिंदे  एक्झिट घेतली आणि तिच्या जागी नवी अंगुरी भाभी म्हणून शुभांगीची वर्णी लागली. शिल्पाने मालिका सोडल्यानंतर टीआरपीमध्येही घसरण झाली होती. पण शुभांगी अंगूरी भाभीच्या भूमिकेत झळकल्यानंतर अल्पावधीतच ती रसिकांच्या पसंतीस उतरली. शुभांगीने  कस्तूरी , चिड़िया घर , दो हंसों का जोड़ा, हवन, अधूरी कहानी हमारी सारख्या मालिकांमधून काम केले आहे.  


Web Title: bhabiji ghar par hain actress shubhangi atre latest instagram bold photoshoot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.